कर्करोगमुक्त पुण्याच्या दिशेने ठोस पावले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

पुणे - शहरात कर्करोग रुग्णालयाच्या उभारणीसाठी महापालिकेने पुढाकार घेतला. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी कर्करोगमुक्त पुण्याच्या दिशेने ठोस पावले उचलण्यात आली आहेत. 

पुणे - शहरात कर्करोग रुग्णालयाच्या उभारणीसाठी महापालिकेने पुढाकार घेतला. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी कर्करोगमुक्त पुण्याच्या दिशेने ठोस पावले उचलण्यात आली आहेत. 

शहरात ससून रुग्णालय परिसरात कर्करोगाचे अद्ययावत रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी ही जागा ताब्यात घेऊन तेथे इमारतीचे बांधकाम सुरू करण्याची प्रक्रिया प्राधान्याने हाती घेतली आहे. त्या जागेवरील १८ झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन तातडीने करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासोबत उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची बैठक झाली. 

ससून रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या शेजारी कर्करोग रुग्णालय प्रस्तावित आहे. ती जागा ससून रुग्णालय प्रशासनाकडे वर्ग करून तेथे कर्करोगाचे अद्ययावत रुग्णालय बांधणार आहे. दोन एकर २० गुंठ्यांत बांधण्यात येणाऱ्या या रुग्णालयात कर्करोगावरील सर्व प्रकारचे उपचार करणार आहे, अशी माहिती ससून रुग्णालय प्रशासनाने दिली.

मेडिकल आँकोलॉजी, सर्जिकल, लहान मुलांच्या कर्करोगाचे उपचार, रेडिओथेरपी, कर्करुग्णांचे पुनर्वसन, त्यासाठी आवश्‍यक वैद्यकीय समाजसेवक अशा सर्व विभागांनी हे रुग्णालय सुसज्ज करण्यात येणार आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला अद्ययावत उपचार मिळतील, अशी सुविधा येथे उपलब्ध होणार आहे.
- डॉ. अजय  चंदनवाले