चांडोली खुर्द मतदार यादीत स्थानिकांची नावे गायब; कर्नाटकची नावे यादीत

डी. के. वळसे पाटील
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

मंचर (पुणे) : चांडोली खुर्द (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत गुंजाळवाडी (ता. जुन्नर), नगर जिल्हा व कर्नाटक राज्यातील ३२ व्यक्तींची नावे समाविष्ट झाली आहेत. स्थानिक नागरिकांनी वेळेत रितसर अर्ज करूनही १२ जणांची नावे मतदार यादीत समाविष्ट नसल्याचा धककादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मंचर (पुणे) : चांडोली खुर्द (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत गुंजाळवाडी (ता. जुन्नर), नगर जिल्हा व कर्नाटक राज्यातील ३२ व्यक्तींची नावे समाविष्ट झाली आहेत. स्थानिक नागरिकांनी वेळेत रितसर अर्ज करूनही १२ जणांची नावे मतदार यादीत समाविष्ट नसल्याचा धककादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मंचरच्या पूर्वेला पाच किलोमीटर अंतरावर चांडोली खुर्द गाव आहे. एक हजार ६१० मतदारांची संख्या आहे. मतदार यादीतील नावांचे वाचन गुरुवारी (ता. ७) ग्रामपंचायत कार्यालात करण्यात आले. मतदार संघ १९६ मधील भाग क्रमाक १३६ च्या मतदार यादीतील नावे ऐकून गावकरी गोंधळून गेले. आधार कार्ड व रहिवासी दाखला अन्य गावाचा पण मतदार मात्र चांडोली खुर्द गावाचा. पिंपळगाव, खडकी, कळंब (ता. आंबेगाव), गुंजाळवाडी, नगर जिल्हा व कर्नाटक राज्यातील नागरिकांची येथील मतदार यादीत नावे आल्याचे लक्षात आले. संबंधीत व्यक्तींचा गावाशी दुरान्वे संबंध नाही. पुरावा म्हणून सोबत जोडलेल्या कागद पत्रातही खाडाखोड केल्याचे आढळून आले, अशी माहिती उपसरपंच राजू बांगर यांनी दिली.

गावातील बारा नागरिकांनी सर्व कागद पत्राची पूर्तता केली होती. पण त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट झाली नाहीत. या बाबत हरकती घेण्याची मुदत मंगळवार (ता. १२) पर्यंत आहे. सरपंच बबनराव शिंदे, माजी सरपंच बी.टी. बांगर, साहेबराव इंदोरे, पंडित इंदोरे यांच्या नेतृत्वखाली शुक्रवारी (ता. ८) घोडेगाव येथे तहसीलदार रवींद्र सबनीस यांना गावकर्यांचे शिष्टमंडळ भेटले. मतदार यादीत बोगस समाविष्ट केलेली नावे काढून टाकावीत. कागदपत्र दाखल करूनही मतदार यादीपासून वंचित राहिल्या नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

सदाभाऊ यांचा अखेर 'सवतासुभा'

इनक्‍युबेटरचा सरसकट वापर अनावश्‍यक

ओडिशात आघाडी करणार नाही: अमित शहा

फिरोज, ताहीर यांना फाशीची शिक्षा

श्रुती बडोले यांनी शिष्यवृत्ती अर्ज घेतला मागे

उच्चशिक्षण क्षेत्रासमोरच्या आव्हानांवर चिंतन

बैलांच्या शर्यतींबाबतचा मसुदा अंतिम टप्प्यात

तरंगत्या सौर पॅनेलद्वारे 'उजनी'वर ऊर्जानिर्मिती शक्‍य

हिंसाचाराला "डेरा'चे आर्थिक पाठबळ

कोमलला मिळाले मदतीचे ‘हृदय’

Web Title: pune news chandoli khurd election list Local names disappeared