चांडोलीत अद्यावत बाजार संकुल उभारणार: देवदत्त निकम

डी. के. वळसे पाटील
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

मंचर (पुणे) : 'चांडोली खुर्द (ता. आंबेगाव) यथे सहा हेक्टर जमिनीत आडत गाळे, गुरांचा बाजार, शीतगृह, पेट्रोल पंप, वजन काटा आदी सुविधा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारल्या जातील. राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली अद्यावत बाजार संकुल उभे करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे,' असे बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी सांगितले.

मंचर (ता. आंबेगाव) येथे बाजार समितीच्या झालेल्या १४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निकम बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, आंबेगाव पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, रुपाली जगदाळे, बाबुराव बांगर, ज्ञानेश्वर गावडे, शिवाजीराव लोंढे, प्रकाश घोलप, बाबासाहेब खालकर, महादू भोर, सर्वसंचालक, शेतकरी, अडते व्यापारी, हमाल मापाडी, सोसायटी व ग्रामपंचायत प्रतिनिधी उपस्थित होते.

निकम म्हणाले, 'मंचर बाजारसमितीच्या आवारात शेतीमाल विक्रीसाठी जागा अपुरी पडत आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या दूरदृष्टी पणामुळे पूर्वीच चांडोली खुर्दमध्ये जागा उपलब्ध आहे. तेथे शेतकर्यांना सर्व सुविधा देणारे अद्यावत बाजार संकुल उभे केले जाईल. फळे व भाजीपाला नियमन मुक्ती, आडत बंदी, नोटाबंदी यामुळे शेतीमालाचे आवक व बाजार भावावर परिणाम झाला आहे. उपबाजार तळेघर येथे पेट्रोल पंप, लोणी येथे कांद्याचा लिलाव सुरु केला जाणार आहे.'

पणन मंडळाच्या शेतमाल तारण कर्ज योजनेतून शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजदराणे लोणी व घोडेगाव येथील गोदाम उपलब्ध करून देण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. असेही निकम यांनी सांगितले. 'तरकारी मालाचे बाजारभाव सर्वांसमक्ष पारदर्शक पद्धतीने व्हावेत,' अशी मागणी प्रभाकर बांगर व धोंडिभाऊ भोर यांनी केली. अडते संजय मोरे यांनी अडत्यांची बाजू यावेळी सांगितली. अहवालवाचन सचिव गणेश गावडे यांनी केले. संचालक प्रमोद वळसे पाटील यांनी सूत्रसंचालक केले. बाजार समितीचे उपसभापती संजय शेळके यांनी आभार मानले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :