छत्रपती संभाजी राजेंकडून घोलप कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन

पराग जगताप
रविवार, 20 ऑगस्ट 2017

हर्षदच्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय हालाखीची असून हर्षद हा या कुटुंबातला एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील मानसिक आजाराने त्रस्त असून बहिणीचे विवाह झालेले आहेत. हर्षदच्या मृत्युने त्याच्या मातेची झालेली अवस्था पाहून खुद्द छत्रपती संभाजी राजेंनाही गहीवरुन आले.

पुणे : रोहोकडी (ता.जुन्नर) येथील मयत हर्षद घोलपच्या कुंटुबीयाची नुकतीच छत्रपती संभाजी राजे भोसलेंनी घरी येऊन भेट घेऊन सांत्वन केले.

मुंबईतीस मराठा क्रांती मोर्चाहून परत येत असताना झालेल्या अपघातात हर्षद घोलपचा मुत्यू झाला होता. त्याच पार्श्वभुमीवर याच्या कुटुंबियांची छत्रपती संभाजी राजेंनी प्रत्यक्ष रोहोकडी येथे येवुन भेट घेऊन सांत्वन केले.

हर्षदच्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय हालाखीची असून हर्षद हा या कुटुंबातला एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील मानसिक आजाराने त्रस्त असून बहिणीचे विवाह झालेले आहेत. हर्षदच्या मृत्युने त्याच्या मातेची झालेली अवस्था पाहून खुद्द छत्रपती संभाजी राजेंनाही गहीवरुन आले.

त्यांची हालाखीची परिस्थिती पाहून या कुटुंबाला खऱ्या अर्थाने समाजातून पाठबळ मिळण्याची गरज संभाजीराजेंनी व्यक्त केली. तसेच छत्रपती संभाजीराजेंनी या कुटंबाला वैयक्तिक एक लाख रूपयांची मदत केली. तसेच सरकार कडुनही मदत मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आणि मयत हर्षद घोलप ज्या पुण्यातील डी. वाय. पाटील संस्थेत शिकत होता त्या संस्थेचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्याशी फोनवरुन संपर्क साधुन मयत हर्षदच्या  दोन बहीणी पैकी एकीला तरी संस्थेत कायम स्वरूपी नोकरी देण्यात यावी अशी मागणी केली. सदरील मागणी आमदार सतेज पाटील यांनी तात्काळ मान्य करत या कुटुंबाला फार मोठा दिलासा दिला.

यावेळी छत्रपती संभाजी राजेंनी प्रत्यक्ष घोलप कुंटुबाल भेट देऊन संवेदना व्यक्त केल्यामुळे जुन्नर तालुक्यातील जनतेची मने जिंकली असुन नागरिकांच्या मनात त्यांच्या बद्दल आदर वाढला आहे. त्यांनी कृतीतुन सामाजिक बांधिलकी जपली. त्याबद्दल ग्रामस्थ व मराठा समाजातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी संभाजी राजें समवेत शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीवजी भोर पाटील, छावा संघटनेचे जुन्नर तालुका अध्यक्ष विजू देवकर, भाजप तालुका अध्यक्ष भगवान घोलप, रोहोकडी सरपंच सुनीता घोलप तसेच परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.