चीनने आपली भूमिका सौम्य करावी ! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

पुणे - "" आम्ही बलाढ्य आहोत. आम्ही श्रीमंतही आहोत. पण त्याचा अर्थ आम्ही वाट्टेल त्या पद्धतीने आमची ताकद वापरू असा होऊ शकत नाही !... आमच्या ताकदीचा इतर राष्ट्रांसाठी त्रास होईल असा वापर करणे कदापी योग्य ठरणारे नाही. आमच्या सरकारने आपल्या वागण्यात जरा बदल घडवत आपल्या भूमिका सौम्य करायला हव्यात,'' अशा शब्दांत चीनी अभ्यासक प्रा. शेन डिंगली यांनी चीनला घरचा आहेर दिला. नुकत्याच झालेल्या डोकलाम प्रकरणाच्या तसेच चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरीडोअरच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले. 

"पुणे इंटरनॅशनल सेंटर'तर्फे आयोजित "पुणे डायलॉग ऑन नॅशनल सिक्‍युरिटी' (पीडीएनएस) या परराष्ट्र धोरण व व्यूहात्मक राजकारण तज्ज्ञांच्या उच्चस्तरीय परिषदेच्या उद्‌घाटनावेळी डिंगली शुक्रवारी बोलत होते. या परिषदेसाठी "सकाळ माध्यम समूह' माध्यम प्रायोजक आहे. लंडनस्थित एशिया स्टडीज सेंटरचे संचालक प्रा. जॉन हेमिंग्स तसेच चीनी अभ्यासक प्रा. वॅंग डॉंग, डॉ. विजय केळकर आदी उपस्थित होते. जागतिक पातळीवरील प्रसिद्ध पत्रकार-लेखक फरीद झकारिया यांनी या वेळी व्हिडिओ संदेशाद्वारे संवाद साधला. 

डिंगली म्हणाले, "" आम्ही भारत आणि पाकिस्तान अशा दोघांचे मित्र आहोत. मात्र, भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये असणाऱ्या तणावात कुठल्यातरी एकाच बाजूने बोलण्याचा आम्हाला अधिकार नाही. चायना-पाकिस्तान कॉरिडोअरच्या बाबतीत आम्ही काळजी घ्यायला हवी. विशेषतः भारताशी असणारे आमचे संबंध पाहता आम्ही अशी चूक करणे योग्य नाही.'' 

या वेळी हेमिंग्स म्हणाले, "" अण्वस्त्र सज्जता ही आज सर्वच राष्ट्रांना गरजेची वाटत असली, तरीही ही गरजच युद्धखोर वृत्तीला आणि सत्ता संघर्षालाही बळ देत असल्याचे आपण नाकारू शकणारच नाही. त्यामुळे भविष्यात हा संघर्ष अधिक पेटून तो अतीव संहारक पातळीवर जाऊ द्यायचा नसेल तर, आजच अण्वस्त्र सज्जतेचा पुनर्विचार करायला हवा.''