डिझायनर बेल्स आणि कलरफुल कॅंडल्स...

डिझायनर बेल्स आणि कलरफुल कॅंडल्स...

पुणे - ॲनिमेटेड लॅंप, डिझायनर ख्रिसमस बेल्स अन्‌ ख्रिसमस स्पेशल कलरफुल मेणबत्त्या... अशा ख्रिसमसच्या सजावटीच्या साहित्यांनी संकेतस्थळे सध्या सजली आहेत. प्रत्यक्ष बाजारपेठेत जाऊन खरेदी करण्यापेक्षा घरबसल्या ऑनलाइन शॉपिंगची आवड लोकांमध्ये वाढल्याने विविध संकेतस्थळांनी ख्रिसमससाठी सजावटीचे साहित्य लोकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. 

ख्रिसमस ट्री असो वा बेल्स... झिरमिळ्या असो आकाशकंदील... ख्रिसमससाठी सजावटीचे वैविध्यपूर्ण साहित्य ऑनलाइन खरेदीसाठी आहेतच. ‘मेरी ख्रिसमस’ असे विविध संदेश असलेले खास पोस्टर्ससह विद्युत रोषणाईसाठीच्या दिव्यांमध्येही वैविध्यता पाहायला मिळेल. सजावटीच्या साहित्याचे शेकडो पर्याय ऑनलाइन संकेस्थळांवर उपलब्ध आहेत. 

ख्रिसमसच्या निमित्ताने ऑनलाइन संकेतस्थळांनी सजावटीचे वैविध्यपूर्ण पर्याय उपलब्ध आहेत. रोषणाईच्या एलईडी दिव्यांसह ॲनिमेटेड लॅंपही खरेदीसाठी उपलब्ध आहे. यंदा खास २५ प्रकारचे सजावटीचे साहित्य असलेला बॉक्‍स संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्यात ख्रिसमस ट्रीपासून ते कॅंडल्सपर्यंतच्या साहित्यांचा समावेश आहे. वॉल हॅंगिंग, कलरफुल कॅंडल्स, फुलदाण्या, आर्टिफिशल फुले आणि वॉल डेकोरेशनसाठीचे विविध साहित्य आहेत. विविध रंगांतील बेल्स आणि आकाशकंदीलही उपलब्ध आहेत. 

ऑनलाइन खरेदीला नागरिकांची पसंती मिळत आहे. सजावटीच्या साहित्यांवर २० ते ५० टक्‍क्‍यांचा डिस्काउंटही देण्यात आला आहे. खासकरून ख्रिसमस ट्री, बेल्स, कॅंडल्स, वॉल हॅंगिंग अशा साहित्यांवर सवलतींचा लाभ घेता येणार आहे. विशेष म्हणजे मुझिकल ख्रिसमस ट्रीसह मुझिकल ख्रिसमस लाइट्‌सही खरेदी करता येईल. ख्रिसमस ट्रीच्या सजवाटीसाठीही संकेतस्थळांवर विविध साहित्य उपलब्ध आहेत. यासाठी खास बॉक्‍स तयार केले आहेत. एलईडी लाइट्‌स, बेल्ससह सांताक्‍लॉजचे कपडे आणि मुखवटेही आहे. 

ख्रिसमससाठी मी दरवर्षी सजावटीच्या साहित्यांची खरेदी ऑनलाइन करतो. याद्वारे सजावटीचे विविध साहित्य खरेदीसाठी उपलब्ध आहे. ख्रिसमस ट्रीपासून ते आकाशकंदिलापर्यंत विविध पर्याय घरबसल्या खरेदी करता येत असल्याने आम्ही ऑनलाइन खरेदीवर भर देतो.
-जॉन लोकनादन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com