दुर्मीळ नाणी पाहण्याची "कॉईनेक्‍स'मधून संधी 

दुर्मीळ नाणी पाहण्याची "कॉईनेक्‍स'मधून संधी 

पुणे - इंटरनॅशनल कलेक्‍टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटेम्सतर्फे 15 ते 17 डिसेंबरदरम्यान "कॉईनेक्‍स पुणे 2017' प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष नरेंद्र टोले यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी उपाध्यक्ष राजेंद्र शहा, रवींद्र दोशी, सचिव शरद बोरा, प्रदर्शनाचे समन्वयक नितीन मेहता उपस्थित होते. 

यंदा प्रदर्शनाचे 22वे वर्ष असून प्रदर्शनात प्राचीन, मुघल, नजराणा, एरर अशी दुर्मीळ आणि प्राचीन नाणी पुणेकरांना बघायला मिळणार आहेत. तसेच या निमित्त तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या नाण्यांची ओळख, त्यांची अंदाजे किंमत, त्यांचे वर्ष, इतिहास, त्यावरील अक्षरे, चित्र, ठसे या विषयीची मार्गदर्शनपर माहिती नाणकशास्त्रातील तज्ज्ञांकडून जाणून घेता येणार आहे. शिवाजी महाराजांच्या काळातील सोने, चांदी आणि तांब्याचे होन हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहे. प्रदर्शनाचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. 15) सकाळी 10 वाजता नाणकशास्त्र तज्ज्ञ आणि नाणक संग्राहक चार्टड अकाउंटंट प्रशांत कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे; तसेच नाणक संग्रह क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पुण्यातील संग्राहक अरविंद आठवले आणि लखनौ येथील संग्राहक रणविजय सिंग यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. "कॉईनेक्‍स पुणे 2017' या प्रदर्शनावर आधारित एका स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. औरंगाबादचे आशुतोष पाटीललिखित "पश्‍चिमी क्षत्रपांची नाणी' या पुस्तकाचे प्रकाशन होईल, असेही टोले यांनी सांगितले. कर्वे रस्ता येथील सोनल हॉलमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत प्रदर्शन खुले राहील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com