ऐकलंत का? निवृत्तीनंतर पैसा पत्नी व स्वतःच्या नावावर ठेवा!

युनूस तांबोळी
सोमवार, 3 जुलै 2017

एका समारंभातील मार्मिक टिपण्णीमुळे घडलेला विनोदी किस्सा...

laugh

शिरूर पोलिस ठाण्यात नुकतेच सहायक फौजदार के. डी. थोरात यांच्या सेवानिवृत्तीचा समारंभ पार पडला. काम करत असताना त्यांनी पोलिसी खाक्‍या दाखविण्याऐवजी तंटे मिटविण्यावर अधिक भर दिला. त्यामुळे या वेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अगोदर एसआरपी व नंतर पोलिस दलात कार्यरत असताना त्यांचे नागरिकांबरोबर चांगले संबंध होते. कार्यक्रमात मान्यवरांनी शुभेच्छा देताना, "आता कुटुंबाकडे लक्ष द्या,' असे त्यांना सुचविले.

या वेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र कुंटे म्हणाले, की पोलिस कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम त्या ठाण्यापुरता मर्यादित असतो. मात्र थोरात यांनी काम करताना समाजरचनेवर अधिक भर दिला आहे. कायद्याच्या बंधनात राहून तंटे मिटविण्याचे काम केले. त्यामुळेच त्यांच्या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

मी त्यांना एकच सल्ला देईन. समाजासाठी काम केल्यानंतर सहचारिणी म्हणजेच पत्नीकडे यापुढे लक्ष द्यावे. त्यांना जास्तीत जास्त वेळ द्यावा. सेवानिवृत्तीनंतर मिळणारी ग्रॅच्युइटी किंवा फंडाचा पैसा त्यांनी पत्नी व स्वतःच्या नावावर ठेवावा; अन्यथा संपूर्ण आयुष्य समाजाची भांडणे मिटविण्यात गेली. म्हातारपणात पैशासाठी पोरांबरोबर भांडणे करावी लागतील. तुम्हाला खोटं वाटतं असेल, तर मी तुम्हाला नटसम्राट चित्रपटाची दोन तिकिटे मोफत आणून देतो. तेवढा नटसम्राट पाहाच; म्हणजे तुमच्या लक्षात येईल. यावर सभास्थळी एकच हशा झाला.

या कार्यक्रमास थोरात यांचे कुटुंब आले होते. त्यांच्या सूनबाईला माझा राग आला असेन, हे सांगायला ते मात्र विसरले नाहीत.  

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वडिलांची दादागिरी​
चांगला कर साधासरळ ठरावा!​
#स्पर्धापरीक्षा - आय एन एस तिहायु​
भारताचा विंडीजकडून 11 धावांनी पराभव​
प्रणवदांनी वडिलांसारखी काळजी घेतली : मोदी​
चीनबरोबरील वाद: सिक्कीममध्ये लष्कराच्या अतिरिक्त तुकड्या​
विवाहातील बचतीतून वऱहाडींना वाटली 2 हजार रोपे​
नाशिक भागात पावसाची उघडीप : शेतीकामांना वेग​