कॅानिर्या प्रत्यारोपणामुळे 'तिला' आली दृष्टी...

शामल चंबरे व वडिल सुनिल व आई अनिता.
शामल चंबरे व वडिल सुनिल व आई अनिता.

हडपसर (पुणे): 'ती' जन्मतःच दृष्टिहिन. मात्र, तिच्या उजव्या डोळ्यावर कॅार्निया प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने तिला आता सुंदर जग डोळ्याने पाहता येऊ लागले. पुस्तके वाचून अभ्यास करता येऊ लागला. त्यामुळे तिला आणि तिच्या आई- वडिलांच्या आनंदाला पारावार उरला नाही. शामल चंबरे असे त्या मुलीचे नाव. कोथरूड येथील पुणे अंधशाळा, मुलींची येथे ती नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.

इंदापूर तालुक्यातील चांडगाव हे तिचे गाव. वडिल देखील दृष्टिहिन आहेत. पत्नीच्या मदतीने ते मासेमारीचे व्यवसाय करतात. अचानाक शामलचे डोळे दुखू लागले. डोळ्यातून सतत पाणी येते. त्यामुळे तिचे कोणत्याही कामात लक्ष लागत नव्हते. ती अस्वस्थ होऊन सतत रडते. वडिल सुनिल व आई अनिता यांनी उपचारासाठी नेत्रतज्ञांना दाखविले. मात्र, घरची गरिबी असल्याने उपचार घेता आले नाहीत. तसेच शस्त्रक्रिया केली तरी तिला दिसू शकणार नाही, असे डॅाक्टरांनी सांगितले. गरिबी व आपल्या मुलीच्या चिंतेने आई-वडिल त्रस्त झाले होते.

अखेर पुणे अंधशाळेचे सचिव महेंद्र पिसाळ यांना वडिल सुनिल चंबरे यांनी मुलीवर शस्त्रक्रिया करण्याचा खर्च संस्थेने करावा अशी विनंती केली. संस्थेने तातडीने दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात तिला डोळे तपासणीसाठी पाठविले. डॅा. श्रीकांत जोशी यांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर कॅार्निया प्रत्यारोपण केल्यानंतर दृष्टि येऊ शकेल, असा अहवाल कॅार्निया सर्जन डॅा. सुचिस्मिता बेहरे यांनी दिला. शामलचे नाव कॅार्निया प्रत्यारोपणासाठी नोंदविले गेले.

एप्रिल महिन्यात कॅार्निया उपलब्ध झाला असल्याचा रूग्णालयातून वडिलांना फोन आला. तातडीने तिला रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर कॅार्निया प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली व तिला उजव्या डोळ्याने दिसू लागले. शस्त्रक्रियेचा सर्व खर्च संस्थेने केला तसेच रूग्णालयाने देखील सवलत दिली.

शामल म्हणाली, 'मला एका डोळ्याने दिसू लागल्याने सुंदर जग मला पाहता येऊ लागले आहे, विविध रंग, वस्तू पाहता येतात. पुस्तके वाचून अभ्यास करता येतो. आता मी चांगला अभ्यास करू शकते. आता मला विविध स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. मी कथक परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण आहे. आता मला खूप चांगले दिसत असून, माझ्या आवडीची चित्रे मी काढू शकते. त्या चित्रांमध्ये मनासारखे रंग भरू शकते. ढोल-लेझीम पथकातील मी लिडर आहे. त्यामुळे ही कामे आता मला चांगल्या प्रकारे करता येतील. दिसू लागल्याने मला जग सुंदर वाटू लागले आहे.'

वडिल सुनिल चंबरे म्हणाले, 'पुणे अंधशाळेच्या विश्वस्त मृणालिनी पवार व सचिव महेंद पिसाळ आणि सामाजिक कार्यकर्त्या सविता वाघमारे यांनी सहकार्य केल्यानेच माझ्या मुलीला दिसू लागले. एकुलती एक मुलगी असल्याने तिची आम्हाला खूप चिंता होती, ती कमी झाली आहे. समाजात चांगल्या संस्था व व्यक्ती आहेत, याची प्रचिती मला या घटनेमुळे आली. तिला दिसू लागल्यानंतर आम्ही पती-पत्नी रात्रभर झोपू शकलो नाही.'

संस्थेचे सचिव महेंद्र पिसाळ म्हणाले, 'पुणे अंधशाळेत दृष्टिहिन विदयार्थ्यांना पहिली ते दहावी पर्यंतचे मोफत निवासी शिक्षण दिले जाते. येथे शालेय शिक्षणा बरोबरच संगीत, गायन, संगणक, क्रीडा शिक्षण दिले जाते. कोथरूड येथे मुलींची तर कोरेगाव पार्क येथे मुलांची शाळा आहे. महाराष्ट्रातील गरजू मुलांच्या पालकांनी (०२०-२६१२२६८६) या क्रमांकावरती शाळेत प्रवेशासाठी संपर्क साधावा.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com