कंत्राटी सुरक्षारक्षकांच्या नेमणुकीला स्थायीची मंजुरी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

पुणे - महापालिकेच्या विविध खात्यांमध्ये आता नव्याने साडेचारशे सुरक्षारक्षकांची कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात येणार आहे. त्या संदर्भातील प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली. ज्या खात्यांमध्ये गरज आहे, त्याच ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्यात येतील, असे स्थायी समितीने स्पष्ट केले आहे. 

महापालिकेच्या मुख्य इमारतींसह क्षेत्रीय कार्यालये, दवाखाने, उद्याने, जलशुद्धीकरण केंद्रात सुरक्षारक्षक नेमले आहेत. त्यानुसार महापालिकेकडील 1 हजार 800 पैकी नऊशे कंत्राटी सुरक्षारक्षकांना कामावरून काढण्यात आले होते. त्यावरून सुरक्षारक्षकांनी आंदोलनही केले होते. मात्र आवश्‍यकतेपेक्षा अधिक सुरक्षारक्षक घेणार नसल्याची भूमिका स्थायी समितीने घेतली होती. परंतु सध्या अपुरे सुरक्षारक्षक असून, त्यातील किमान दीडशे जणांची सुटी असते. तसेच, सध्या 1 हजार 650 सुरक्षारक्षकांची आवश्‍यकता असल्याचे प्रशासनाने म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवर निविदा न काढता संबंधित ठेकेदाराकडून सुरक्षारक्षक घेता येतील, असेही प्रशासनाने प्रस्तावात म्हटले होते. त्यानुसार साडेचारशे सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यासाठी सुमारे 8 कोटी 50 लाख खर्च येणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. मात्र या पुढील काळात सुरक्षारक्षकांची नेमणूक करू नये आणि त्याबाबतचा प्रस्तावही ठेवू नये, अशी सूचना मोहोळ यांनी केली. 

Web Title: pune news Contract Security Guard PMC standing committee