सशस्त्र दरोड्यातील आरोपींना अटक 

सशस्त्र दरोड्यातील आरोपींना अटक 

पुणे - शहराच्या मध्यवर्ती भागात कसबा पेठेतील क्‍विक कुरिअरवर सशस्त्र दरोडा टाकून सव्वादोन लाख रुपये लुटणाऱ्या पाच दरोडेखोरांना दक्षिण प्रादेशिक विभागाच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने 48 तासांत अटक केली. आरोपींकडून पिस्तुलासह चार जिवंत काडतुसे, तीन दुचाकी आणि सहा मोबाईल असा सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

उत्तमकुमार जसराम माली (वय 30), भैरुलाल हरिशंकर रावल (20), शंभुशिंग मुलसिंग सिंदल (21), जितेंद्र असुसिंग राजपूत (22) आणि जितेंद्र सुमेरसिंग राठोड (24, सर्व रा. रविवार पेठ, मूळ रा. राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

कसबा पेठेत विनोद मुंढे यांचे क्‍विक कुरिअरचे कार्यालय आहे. मंगळवारी (ता. 22) दुपारी आरोपींनी मुंढे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून सव्वादोन लाखांची रोकड आणि तीन मोबाईल चोरून नेले होते. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त रवींद्र सेनगावकर यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दक्षिण प्रादेशिक विभागाने स्थापन केलेल्या दरोडा प्रतिबंधक पथकातील कृष्णा बढे आणि योगेश घाटगे यांनी खबऱ्यांना सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपींची छायाचित्रे दाखवली. त्यावरून आरोपी गुरुवार पेठेतील कस्तुरे चौकात एका इमारतीमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सहायक निरीक्षक प्रकाश मोरे यांच्या पथकाने छापा टाकून आरोपींना अटक केली, तर अन्य चार जण पसार झाले आहेत. 

साथीदारांच्या मदतीने कट 
आरोपी भैरुलाल रावल हा कस्तुरे चौकात हॉटेल महाराणा दरबार येथे मेस चालवतो, तर शंभुसिंग सिंदल त्या मेसमध्ये जेवण्यासाठी येत असे. त्याला क्‍विक कुरिअरमध्ये पैसे कोठे ठेवतात, याची माहिती होती. त्याने इतर साथीदारांच्या मदतीने दरोड्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com