दुचाकी चोरणाऱ्या दोघांची वैयक्तिक हमीवर सुटका 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

पुणे - दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात न्यायालयाने दोन युवकांची चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर सुटका केली आहे. पंधरा हजार रुपयांची वैयक्तिक हमी आणि एक वर्षाच्या मुदतीत गैरवर्तणूक केल्यास तीन वर्षे कारावास भोगण्याची अटही न्यायालयाने घातली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. मेश्राम यांनी हा निकाल दिला आहे. 

नोव्हेंबर 2010 मध्ये चोरीचा गुन्हा उघड झाला होता. फिर्यादीच्या भावाने त्यांच्या इमारतीमध्ये पार्क केलेली दुचाकी या दोघांनी चोरून नेली होती. समर्थ  पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालणाऱ्या पोलिसांना दारूवाला पुलाजवळ आरोपी एक दुचाकी फडके हौदाच्या दिशेने ढकलून नेताना दिसले. पोलिस उपनिरीक्षक दत्तू हेमाडे यांनी विचारणा केल्यानंतर आरोपींनी दुचाकीतील पेट्रोल संपल्याचे कारण सांगितले. पोलिसांनी आरोपींकडे गाडीची कागदपत्रे आणि वाहन परवान्याची मागणी केली. त्यांच्याकडे कागदपत्रे आणि परवाना नसल्याने अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी ही दुचाकी चोरल्याची कबुली दिली होती. या खटल्यात सहायक सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर यांनी सहा जणांची साक्ष न्यायालयात नोंदविली. न्यायालयाने आरोपींना एक हजार रुपये दंडही ठोठावला आणि त्यांची चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर सुटका केली. 

Web Title: pune news crime