पंचतारांकित हॉटेलवर छापा; दोन परदेशी तरुणींसह तिघींची सुटका 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

पुणे - येरवडा परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून हायप्रोफाईल वेश्‍या व्यवसायाचा पर्दाफाश केला. पोलिसांनी त्या हॉटेलमधून दोन परदेशी तरुणींसह तीन महिलांची सुटका केली. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सोमवारी रात्री ही कारवाई केली. 

याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राहुल ऊर्फ राजू, जॉन ऊर्फ प्रकाश शर्मा ऊर्फ जतिन चावला; तसेच मुंबईतील सागर, टोनी आणि सुरेश अशी संशयितांची नावे आहेत; तर पीडित तरुणींची महंमदवाडी येथील रेस्क्‍यू होममध्ये रवानगी करण्यात आली. 

येरवडा परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये परदेशी तरुणींकडून वेश्‍या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील यांना मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेचे अतिरिक्‍त आयुक्‍त प्रदीप देशपांडे, पोलिस उपायुक्‍त पंकज डहाणे आणि सहायक आयुक्‍त संजय निकम यांनी कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्यासह शीतल भालेकर, चंद्रकांत जाधव, नितीन तेलंगे, नामदेव शेलार, नितीन लोंढे, सचिन कदम, प्रमोद शेलार आदी कर्मचाऱ्यांनी या हॉटेलवर छापा टाकला. या छाप्यात रशिया आणि उझबेकिस्तान येथील दोन आणि दिल्ली येथील एका तरुणीची दलालांच्या तावडीतून सुटका करण्यात आली.

Web Title: pune news crime