इराणी विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या प्राध्यापकास अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

पुण्यातील पौड रस्त्यावरील महाविद्यालयात इराण येथील एक विद्यार्थिनी पीएच.डी. करण्यासाठी येथे प्रवेश घेण्यासाठी आली होती.

पुणे : शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या इराणी विद्यार्थिनीकडे महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी शारीरिक सुखाची मागणी करत, गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासण्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एका इराणी तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरोधात गुन्हा केला दाखल करण्यात आला असून, संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. काल (बुधवार) हा प्रकार घडला असून, विनयभंग करणारा आरोपी भारती विद्यापीठात प्राध्यापक असल्याची माहिती समोर आली आहे. 

पुण्यातील पौड रस्त्यावरील महाविद्यालयात इराण येथील एक विद्यार्थिनी पीएच.डी. करण्यासाठी येथे प्रवेश घेण्यासाठी आली होती. घटनेच्या दिवशी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ती महाविद्यालयाचे प्राध्यापक शिवाजी बोऱ्हाडे यांना भेटली. मात्र शिवाजी बोऱ्हाडे यांनी तिला प्रवेश देण्यासाठी शारीरिक सुखाची मागणी केल्याची तक्रार तिने पोलिसात केली आहे. प्राध्यापक शिवाजी बोऱ्हाडे यांच्या विरोधात कोथरूड पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :