बांधकाम व्यावसायिकाला फसवणूकप्रकरणी अटक 

बांधकाम व्यावसायिकाला फसवणूकप्रकरणी अटक 

पुणे - सदनिका विक्री व्यवहारात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी नवी मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाला अटक केली. न्यायालयाने त्याची 19 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. 

याप्रकरणी सुभाष दास या ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांकडे फिर्याद दिली. अजितकुमार मधुसूदन सिंग (वय 32, रा. नवी मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. हा फसवणुकीचा प्रकार 2012 ते 2016 या कालावधीत घडला. जानेवारी 2016 मध्ये गुन्हा नोंदविल्यानंतर सिंग हा पसार झाला होता. तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. यामुळे गुन्ह्याचा तपास थंडावला होता. हा गुन्हा पुन्हा उघड करून त्याचा तपास करण्याचा आदेश वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. आरोपी लोणावळा येथील आयएनएस शिवाजी रस्त्यावरील चौपाटी रिसॉर्टमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने फसवणूक केल्याची कबुली दिली. आरोपीने फिर्यादीबरोबर आणखी पाच जणांची एकूण 74 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याची माहिती पुढे आली. आरोपीची श्रीकृष्णा प्रॉपर्टीज नावाची संस्था असून, त्याने "वृंदावन' नावाचा प्रकल्प जाहीर केला. या प्रकल्पात दास यांनी सदनिका घेण्यासाठी सिंगला पाच लाख रुपये आगाऊ दिले होते. सदनिका दिली नाही आणि पैसे न देता आरोपी पसार झाला होता. याच प्रकारे त्याने इतरांची फसवणूक केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com