दोन सराइतांना अटक; 51 गुन्हे उघडकीस 

दोन सराइतांना अटक; 51 गुन्हे उघडकीस 

पुणे - साखळी चोरी, घरफोडी, फसवणूक, वाहनचोरी यासह अन्य गुन्ह्यात सराईत असलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट पाचने अटक केली. त्यांच्याकडून 51 गुन्हे उघडकीस आणले असून तब्बल एक कोटी 28 लाख 92 हजार 747 रुपयांचा ऐवज जप्त केला. यामध्ये दोन किलो सोन्याचे दागिने, 66 लाखांची रोकड आणि तीन लाखांच्या परकीय चलनाचा समावेश आहे. यातील एकाने कोट्यवधीची माया कमावली असून, दौंडजवळ दीड एकर जमीन घेतली आहे. 

जफर शाहजहान इराणी (वय 38, रा. पठारे वस्ती, वाखरी, दौंड) अमजद रमजान पठाण (35, रा. टीपीसी रस्ता, परळी, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. जफर इराणी याने "हिंदुस्थानी इराणी संघ' नावाची संघटना स्थापन केली आहे. त्याची अनेक मोठ्या लोकांसोबत ऊठबस आहे. जफरने पठाणच्या मदतीने पुण्यासह इतर ठिकाणी अनेक गुन्हे केले आहेत. जफर हा पठाणसोबत मंतरवाडी-उंड्री या रस्त्याने दुचाकीवरून जात असल्याची माहिती युनिट पाचचे पोलिस हवालदार माणिक पवार, नाईक अमजद पठाण, प्रमोद घाडगे यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्यांना पकडण्यात आले. 

अधिक चौकशी केली असता दुचाकी चोरीची असल्याचे त्यांनी सांगितले. एक जून रोजी त्याने कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत साखळी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच गेल्या चार वर्षात त्यांनी शहरात साखळी चोरीचे 18, फसवणुकीचे 18, घरफोडीचे पाच, वाहनचोरीचा एक आणि इतर चोरीचे नऊ असे एकूण 51 गुन्हे केल्याचे उघडकीस आले. 

युनिट पाचचे वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण, सहायक निरीक्षक महादेव वाघमोडे, उपनिरीक्षक अकिल शेख, कर्मचारी माणिक पवार, लक्ष्मण शिंदे, शिवाजी घुले, मनोज साळुंखे, प्रदीप सुर्वे, अजख खराडे, प्रवीण शिंदे, भरत रणसिंग, महेश वाघमारे, प्रवीण काळभोर, सचिन घोलप, गणेश बाजारे, अंकुश जोगदंड, सुहास गायकवाड, संजयकुमार दळवी यांनी ही कारवाई केली. 

जफरवर 12; पठाणवर पाच गुन्हे 
पोलिसांनी सराईतांच्या घराची झडती घेऊन 59 लाख 76 हजारांचे सोन्याचे दागिने, चार हजार 190 रुपयांची चांदी, 66 लाख चार हजार रुपये रोख, तीन लाख आठ हजार रुपयांचे परकीय चलन असा एकूण एक कोटी 28 लाख रुपयांचा ऐवज आणि एअरगन, कॅमेरा, मोठे कटर, स्विफ्ट कार, बुलेट, युनिकॉर्न, आठ मोबाईल, चार हेल्मेट जप्त केले आहेत. जफरवर यापूर्वीचे 12 गुन्हे, तर पठाणवर पाच गुन्हे आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com