गणेश पेठेत तिघांचे मृतदेह आढळले 

गणेश पेठेत तिघांचे मृतदेह आढळले 

पुणे - गणेश पेठ गुरुद्वाराच्या मागील भागात असलेल्या नागझरी नाल्यात शुक्रवारी सायंकाळी तीन मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. या मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, तिघांच्या डोक्‍यावर कठीण वस्तूने मारहाण झाली असून, त्यांचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या बाजूला नागझरी नाला वाहतो. रंगकाम करणाऱ्याला शुक्रवारी सायंकाळी नाल्यात एकाचा मृतदेह आढळला. याबाबतची माहिती मिळताच फरासखाना आणि समर्थ पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी आहे. नाल्यात पाहणी करताना पोलिसांना शंभर मीटरच्या अंतराने आणखी दोन जणांचे मृतदेह आढळले. मृतावस्थेत असलेल्या या तिघांच्याही डोक्‍यावर कठीण वस्तूने मारहाण झाली आहे. प्रभारी पोलिस आयुक्त संजीवकुमार सिंघल, अतिरिक्त पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, प्रदीप देशपांडे, उपायुक्त डॉ. बसवराज तेली, पंकज डहाणे, सहायक आयुक्त समीर शेख हेदेखील घटनास्थळी हजर झाले होते. फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण अंबुरे आणि समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी तीन मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. रात्री उशिरापर्यंत त्यांची ओळख पटू शकली नाही. पोलिसांनी तीनही मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. या भागात वर्दळ नसल्याने भिकाऱ्यांचे वास्तव्य असते आणि अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचा वावर असतो. 

याबाबत सिंघल म्हणाले, ""सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे तिघे भंगार गोळा करण्याचे काम करीत असावेत असा अंदाज आहे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com