कावळा घाण करतो म्हणून तोडले झाड!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

पुणेः रस्त्याच्या बरोबर मध्यभागी झाड येते म्हणून ते तोडल्याचे अनेकदा आपण ऐकले आहे. पण, कावळे झाडावर बसतात, इतकेच नाही तर ते घाणही करतात. त्याच्या झाडाची मुळे घराच्या आवारात वर येतात अशा कारणांचा पाढा वाचत थेट झाडाच्या खोडावर कुऱ्हाड चालवण्याची घटना आज (बुधवार) धायरी येथील मानस सोसायटीच्या परिसरात घडली. कोणतीही परवानगी काढली नसतानाही झाड तोडण्यात आल्याची माहिती या परिसरातील नागरिकांनी दिली.

या बाबत महापालिकेच्या उद्यान विभागाशी संपर्क साधल्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया तातडीने सुरू केली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या ः