दहीहंडी न फोडण्याचा शहरातील मंडळांचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

पुणे - दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात सार्वजनिक मंडळांनी फक्त दोनच स्पीकर्सचा वापर करावा, अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. मात्र पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर दहीहंडी न फोडण्याचा इशारा पुणे शहर दहीहंडी उत्सव समितीने घेतला आहे.

हिंदूंच्या सणांवरच गेल्या काही वर्षांपासून राज्यकर्ते व पोलिस प्रशासनाद्वारे निर्बंध लादले जात आहेत, असा आरोपही समितीच्या वतीने राहुल म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत केला. याबाबत राज्यकर्ते आणि पोलिस प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली. राजेंद्र देशमुख, ओम कासार, राम थरकुटे उपस्थित होते.

गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवांची अनेक वर्षांची परंपरा आहे. मात्र ध्वनिप्रदूषणाचे कारण देत गेल्या काही वर्षांपासून हिंदू सण साजरे करण्यावरच आक्षेप घेण्यात येत आहे. दोनपेक्षा जास्त स्पीकर्सच वापर केल्यास गुन्हा दाखल करणार असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. परंतु शहरात लाइव्ह शो, इव्हेन्ट्‌सचे प्रमाण जास्त आहे. त्या कार्यक्रमांना पोलिस दोनपेक्षा जास्त स्पीकर्सचे परवानगी देतात. मग हिंदू सणांवरच निर्बंध का, असा सवाल समितीने विचारला आहे. पालकमंत्र्यांच्या निर्णयामुळे शहरातील सर्व साउंड, लाइट्‌स, जनरेटर असोसिएशनने आधीच बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे दहीहंडी सण साजरा न करता निषेध नोंदविणार असल्याचे समितीने म्हटले आहे.

Web Title: pune news dahihandi celebration cancel by mandal