जिल्ह्यातील प्रमुख धरणांतून विसर्ग 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

पुणे - खडकवासला धरणसाखळीतील धरणांमध्ये धुव्वाधार पावसामुळे खडकवासलासह वरसगाव, पानशेत धरण शंभर टक्के भरले. त्यामुळे बुधवारी दिवसभरात खडकवासला धरणातून केलेल्या विसर्गामुळे मुठा नदी दुथडी भरून वाहत होती. 

दिवसभर पावसाची संततधार असल्याने जलसंपदा विभागाकडून विसर्गाचे प्रमाण ठरविण्यात येत होते. सकाळी सात वाजता 23 हजार क्‍युसेक्‍सने विसर्गाला सुरवात झाली. तर सकाळी दहा वाजता 18 हजार क्‍युसेक्‍स, दुपारी तीन वाजता 14 हजार क्‍युसेक्‍स आणि सायंकाळी सहानंतर पाऊस ओसरल्यावर दहा हजार क्‍युसेक्‍सपर्यंत विसर्ग करण्यात आला. 

वरसगाव, पवना, घोड, चासकमान, भामा आसखेड, नीरा देवधर, भाटघर आणि वीर या प्रमुख धरणांतूनही नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग करावा लागला. 

वरसगाव परिसरात सुमारे 60 मिमी पाऊस पडल्याने या धरणातून पानशेत धरणातून सुमारे साडेतीन हजार क्‍युसेक्‍स पाणी सोडण्यात आले. पानशेत धरणाच्या क्षेत्रात एक हजार क्‍युसेक्‍स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या दोन्ही धरणांतील पाणी खडकवासला धरणात आल्यानंतर या धरणातून मुठा नदीत सकाळनंतर पाणी सोडण्यात सुरवात करण्यात आली. 

जिल्ह्यातील खडकवासला, वरसगाव, पानशेत, वडज, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडिवळे, आंद्रा, पवना, कासारसाई, नीरा देवघर, भाटघर, वीर, डिंभे यांच्यासह जिल्ह्यातील 17 धरणे शंभर टक्के भरली आहेत. जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधून दिवसभरात नद्यांमध्ये पाणी सोडण्यात आले. घोड धरणातून एक हजार 700 क्‍युसेक्‍स, चासकमानमधून चार हजार क्‍युसेक्‍स, भामा आसखेडमधून साडेपाच हजार, आंद्रामधून सहाशे, नीरा देवधरमधून साडेसात हजार तर वीरमधून 14 हजार क्‍युसेक्‍स पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. 

उजनी धरण क्षेत्रात फारसा पाऊस झाला नसला, तरी हे धरण 108 टक्के भरले असून सध्या 122 टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे 40 हजार क्‍युसेक्‍स पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. 

धरण क्षेत्रात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे नदी काठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये किंवा वाहने नदीपात्रात धुण्यासाठी आणू नयेत,' असे आवाहन खडकवासला धरणाचे कार्यकारी अभियंता शेलार यांनी केले आहे 

Web Title: pune news dam heavy rain