पुणे जिल्ह्यातील धरणांच्या साठ्यात झपाट्याने वाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

पुणे - धरण क्षेत्रात संततधारेमुळे खडकवासला धरणसाखळीसह जिल्ह्यातील धरणसाठ्यांत मंगळवारीदेखील वाढ झाली. त्यामुळे खडकवासलासह जिल्ह्यातील काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.  

जिल्ह्यातील पानशेत, खडकवासला, पवना, नीरा देवघर, चासकमान, कळमोडी, आंद्रा, भामा-आसखेड आणि वडिवळे ही नऊ धरणे शंभर टक्के भरली आहेत. पानशेत धरण शंभर टक्के भरल्यामुळे त्यातून दिवसभरात सुमारे तीन हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सुमारे साडेचार  हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. 

पवना धरणातूनही मुळा नदीमध्ये दिवसभरात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मावळ तालुक्‍यातील धरणक्षेत्रामध्ये पवनेसह वळवण, वडिवळे, आंद्रा, कासारसाई ही धरणे पूर्ण भरली आहेत. तसेच पवना धरणातून आज सहा हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

मुळशीमधून २० हजार क्‍युसेक, भामा आसखेडमधून १३ हजार क्‍युसेक, चासकमानमधून पाच हजार क्‍युसेक, वडिवळेमधून पाच हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग केल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. संतत धारेमुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यात वाढ झाली आहे.

Web Title: pune news dam rain