‘मधुरांगण’तर्फे दांडिया स्पर्धेचे आयोजन

‘मधुरांगण’तर्फे दांडिया स्पर्धेचे आयोजन

पुणे - सकाळ मधुरांगण व पुणे लोकमान्य फेस्टिव्हलने गुरुवारी (ता. २८) महाराष्ट्रातील पहिला महिला दांडिया खेळ व स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

लोकमान्यनगर, जॉगिंग पार्क, नवी पेठ येथे सायं. ७.३० वाजता हा फेस्टिव्हल होणार आहे. यामध्ये पुणेकरांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे. फेस्टिव्हलचे प्रमुख आकर्षण रावण दहन व फायर शो आहे. स्पर्धेसाठी लाइव्ह ऑर्केस्ट्रावर थिरकताना एक वेगळा अनुभव घेता येईल. सेल्फी विथ गरबा, दांडिया लुक या स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे.

प्रथम व द्वितीय विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहे. आपले फोटो puneunitmadhurangan@gmail.com या मेल आयडीवर पाठवावेत.
दरम्यान, या वेळी विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा ‘पुणे लोकमान्य पुरस्कार २०१७’ या पुरस्काराच्या माध्यमातून सन्मान केला जाणार आहे. तसेच महिला दांडिया कार्यक्रमात बेस्ट परफॉर्मन्स, बेस्ट ड्रेस, बेस्ट ग्रूप स्पर्धा होणार असून, विजेत्या महिलांना आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी मधुरांगणची सभासद नोंदणी होईल.

अधिक माहितीसाठी संपर्क - ८३७८९९४०७६/ ९०७५०१११४२ (वेळ : ११ ते ६)

‘मधुरांगण’चे सभासद व्हा... 
ऑनलाइनसाठी प्ले स्टोअरवरून मधुरांगण ॲप डाउनलोड करूनही सदस्यत्व नोंदणी शक्‍य 

कुरिअरचा ऑप्शन निवडून सभासदत्व आणि कुरिअरची रक्कम ऑनलाइन भरल्यास गिफ्ट व इतर सर्व साहित्य घरपोच 

ॲपवरून नोंदणी करणाऱ्यांना भेटवस्तू १५ दिवसांनंतर मिळतील; अन्यथा ‘सकाळ’च्या बुधवार पेठ किंवा पिंपरी कार्यालयात संपर्क साधून (सकाळी ११ ते सायं. ६) त्या नेता येतील

ॲपव्यतिरिक्त नोंदणीसाठी - ‘सकाळ’ मुख्य कार्यालय, ५९५, बुधवार पेठ, पुणे किंवा ‘सकाळ’ पिंपरी कार्यालय, सनशाइन प्लाझा, हॉटेल रत्नाच्या मागे, पिंपरी. (सकाळी ११ ते सायं. ६).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com