दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला जाणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा घ्या- अजितदादा

संतोष शाळिग्राम
गुरुवार, 25 मे 2017

दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला गिरीश महाजन उपस्थित राहिले, ही गंभीर बाब आहे. सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा.

पुणे : "दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला गिरीश महाजन उपस्थित राहिले, ही गंभीर बाब आहे. सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा," अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमाशी बोलताना केली.

दाऊद संबंधावरून काडीचा संबंध नसताना शरद पवारांची बदनामी केली गेली आता मात्र सरकार मधील जबाबदार मंत्री दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला जातात... यावर चर्चा सुरू झाल्यानंतर मात्र थातूर मातूर उत्तरं दिली जातायत... त्यामुळे गिरीश महाजन यांच्याकडून ही जी चूक झालीय त्यासाठी त्यांचा राजीनामा घेतला जावा. तसेच, या चुकीचे प्रायश्चित्त त्यांनी केलं पाहिजे, असे अजित पवार यांनी सांगितले

पवार म्हणाले, "मुख्यमंत्री सुदैवाने अपघातातून बचावले. आता व्हीआयपी व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टरची देखभाल नियमित, वेळवर होते का, हे तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. दोन पायलट असलेले अत्याधुनिक चॉपर वापरले पाहिजेत.

दरम्यान, अजित पवार माध्यमाशी बोलताना म्हणाले, "पुण्यातील कचरा प्रश्न सोडविण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छाशक्ती नाही. महापालिकेची सत्ता बिल्डर आणि मूठभरांचे आहे."

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या ः
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात; मुख्यमंत्री बचावले​

सगळ्यांच्या आशीर्वादाने सुखरुप: मुख्यमंत्री
भारतीय कन्येचे स्वागत आहे: सुषमा स्वराज​
पाकिस्तानचा दावा संयुक्त राष्ट्रानेही फेटाळला​
शिरुर: विनयभंग प्रकरणी महाराजाला मंदिरातून अटक​
तेजस एक्स्प्रेसमधून हेडफोन चोरीला, एलईडी स्क्रीनवर स्क्रॅच
पुणे अन् कोल्हापुरमधील अपघातग्रस्त बसचा क्रमांक एकच​
सहारनपूरमध्ये मोबाईल इंटरनेटवर बंदी​
काश्मीरमध्ये निर्णय घेण्यासाठी लष्कराचे हात मोकळे: जेटली
शेतकऱ्यांना फसवणाऱ्या टोळक्यात मीही सामील झालो: राजू शेट्टी

मराठा क्रांती मोर्चा 9 ऑगस्टला मुंबईत धडकणार
मुंबई : हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत