बाप्पा, देश आणि राज्यापुढील सर्व विघ्नं दूर कर - मुख्यमंत्री 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

पुणे - ""देश आणि राज्यापुढील सर्व विघ्नं दूर कर, असे श्रींच्या चरणी साकडे घालत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या नवभारत संकल्पात प्रत्येकाने वैयक्तिक सहभाग देऊन नवा भारत घडवूया,'' असा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिला. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या रोषणाईचे उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपती आणि मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्‍वरी मंडळास भेट देऊन त्यांनी दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरली मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक हेमंत रासने, मंडळाचे अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, उल्हास भट आदी उपस्थित होते. 

पुण्यातील गणेशोत्सव रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करत आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ""देश आणि राज्यापुढील विघ्नं दूर करण्याची शक्ती सर्वांना द्यावी, अशी प्रार्थना मी केली आहे. भ्रष्टाचार, दहशतवाद, जातिवादमुक्त भारताची संकल्पना पंतप्रधानांनी केली आहे. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सर्व गणेशभक्तांनी या नवभारत संकल्पनेत वैयक्तिक सहभाग द्यावा.'' मानाचा तिसरा गुरुजी तालिम, मानाचा चौथा तुळशीबाग आणि पाचवा केसरीवाड्याच्या गणेशोत्सवाला भेट देऊन दर्शन घेतले.