‘सकाळ’ ढोल-ताशा स्पर्धेची नोंदणी सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

पुणे - सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आणि ढोल-ताशा महासंघाच्या सहकार्याने घेण्यात येणाऱ्या ‘रांका ज्वेलर्स प्रायोजित ढोल-ताशा स्पर्धा २०१७ पॉवर्डबाय टायझर’साठी पथकांची नावनोंदणी सुरू झाली आहे. भव्य स्वरूपात साजऱ्या होणाऱ्या या स्पर्धेला पथकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

पुणे - सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आणि ढोल-ताशा महासंघाच्या सहकार्याने घेण्यात येणाऱ्या ‘रांका ज्वेलर्स प्रायोजित ढोल-ताशा स्पर्धा २०१७ पॉवर्डबाय टायझर’साठी पथकांची नावनोंदणी सुरू झाली आहे. भव्य स्वरूपात साजऱ्या होणाऱ्या या स्पर्धेला पथकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

ढोल-ताशा-झांज गटात (ग्रामीण शैली) वादनशैली आणि सादर केले जाणारे खेळ यांच्यावर गुण दिले जातील. शहरी गटात वादनशैलीवरच गुण अवलंबून राहणार आहेत. स्पर्धेच्या अन्य अटी व नियम फॉर्मसोबत मिळतील. ‘सकाळ’ने यापूर्वी घेतलेल्या स्पर्धांना राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या ढोल-ताशा स्पर्धेत यंदा राज्यभरातील ढोल-ताशा पथकांसह झांज पथकांचाही निनाद घुमणार आहे. 

ढोल-ताशा आणि झांज पथकांच्या स्पर्धा स्वतंत्र गटांमध्ये होणार असल्याने या वर्षी तालरसिकांना नव्या तालरचनांबरोबर राज्याच्या अन्य भागांतील पारंपरिक ताल आणि खेळांचा आस्वाद घेता येणार आहे. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही विजेत्यांना आकर्षक पारितोषिकेही जिंकण्याची संधी आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या एरंडवणा येथील महालक्ष्मी लॉन्स येथे ९ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. स्पर्धेचे फॉर्म सकाळ कार्यालयात (बुधवार पेठ) उपलब्ध आहेत. 

स्पर्धेची वैशिष्ट्ये...
‘सकाळ माध्यम समूह’च्या वतीने श्री गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त ढोल-ताशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 
या स्पर्धांच्या प्राथमिक फेऱ्यांना ९ ऑगस्टपासून सुरवात. 
शहरी वादन आणि ग्रामीण ढंगाचे वादन (ढोल-ताशा-झांजा-खेळ) अशा दोन स्वतंत्र गटात स्पर्धा होणार.
दोन्ही गटांतील विजेत्यांना स्वतंत्र पारितोषिके. 
स्पर्धेत प्रत्येक संघाला वादनासाठी १५ मिनिटे मिळणार.

रांका ज्वेलर्स प्रायोजित ढोल-ताशा स्पर्धा पॉवर्डबाय टायझर प्राथमिक फेरी - ९ ऑगस्टपासून महालक्ष्मी लॉन्स, पुणे येथे 

नोंदणीसाठी संपर्क - हृषीकेश मुकनाक ९५५२११८७१० (सकाळ कार्यालय, बुधवार पेठ) 

स्पर्धेबाबतच्या अन्य तपशिलासाठी संपर्क ः विनायक बावडेकर ९६८९९११०८६, अमित गोळवलकर ९८८१०९९००५ (सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत)