दिवाळी धमाका प्रदर्शन रविवारपासून

दिवाळी धमाका प्रदर्शन रविवारपासून

पुणे - मनसोक्त खरेदी, खाण्यापिण्याची चंगळ व मनोरंजनाचा परिपूर्ण खजिना असलेल्या ‘सकाळ मधुरांगण’च्या ‘दिवाळी धमाका’ प्रदर्शनाला रविवारी (ता. ८) दिमाखात सुरू होणार आहे. बाजारभावापेक्षा कमी भावात उपलब्ध असणारी दर्जेदार उत्पादने आणि उपयुक्त माहिती देणारे प्रदर्शन मंगळवारपर्यंत (ता. १०) मनोहर मंगल कार्यालय, मेहेंदळे गॅरेज, एरंडवणे येथे आयोजित करण्यात आले आहे. दु. २ ते रात्री ८.३० पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.  

प्रदर्शनात जे सभासद होतील त्यांना ‘ईझी टू कुक’चे विनामूल्य प्रॉडक्‍ट मिळणार आहे. आजकाल धावपळीमुळे लोकांचा खाण्याचा कल रेडीमेडडे वळला आहे. सकस आणि दर्जेदार खाद्यपदार्थांसाठी चवदार फूड्‌स प्रायव्हेट लिमिटेडच्या केसन्स ब्रॅंडने ‘जस्ट हीट अँड इट’ स्लोगनवर फ्रोझन पराठ्याचे चार प्रकार बाजारात उपलब्ध केले आहेत. हे पराठे नैसर्गिक घटकांपासून तयार केले आहेत.

हे रसायनविरहित असून, वर्षभर टिकू शकतात. चविष्ट, रुचकर, प्रोटिनयुक्त हेल्दी स्टफ आलू, ग्रीन पीस, मिक्‍स ग्रॅम, पनीर पराठे एका पाकिटात ४ असून, त्याची किंमत ११० ते १७५ रुपयांपर्यंत आहे. या प्रदर्शनात आजपासून झालेल्या सभासदांसाठीच ही ऑफर असून, यापैकी उपलब्ध प्रॉडक्‍ट मिळतील. हा प्रॉडक्‍ट प्रदर्शनास भेट देणाऱ्या सर्वांसाठी २५ टक्के डिस्काउंटमध्ये उपलब्ध होईल. दरम्यान, ज्या सभासदांनी रिसो ऑइल अजूनही घेतले नसेल त्यांना प्रदर्शनात मिळणार असून, यासाठी आयकार्ड आवश्‍यक आहे.

प्रदर्शनाची वैशिष्ट्ये व कार्यक्रम
रविवार, ता. ८ - सायं. ४ वा : अनुराधा केळकर : सोप्या पद्धतीचे व झटपट होणारे चिरोटे, अनारसे, चकलीची भाजणी व चकली.
सोमवार, ता. ९ - दु. ३ वा : भाग्यशाली चोरडिया अंकशास्त्रानुसार व्यक्तिमत्त्व मार्गदर्शन (कार्यक्रम स्त्री - पुरुषांसाठी)
सायं. ५ वा. : संगीता शहा - कॉर्न चिप्स, टोमॅटो राइस चिप्स, रोझ कोकोनट लड्डू, दुधी खीर, स्वीट पोटॅटो हलवा.
 मंगळवार, ता. १० - दु. ३ वा : अंजली तापडिया - भारतभर गाजलेली कलात्मक प्रात्यक्षिके. आरती थाळी सजावट, गिफ्ट बॉक्‍सेस व ग्रीटिंग कार्ड. एकूण तीस प्रकार.
सायं. ५ वा. - अंजली पुराणिक - व्हेज बिर्याणी,  व्हेज भुना, मलाई कोफ्ता

प्रदर्शनाची वैशिष्ट्ये  
प्रदर्शन, कार्यशाळा सभासदांसाठी व सकाळच्या वाचकांसाठी प्रवेश विनामूल्य
विनामूल्य पार्किंग 

स्टॉलसाठी व अधिक माहितीसाठी संपर्क - ८३७८९९४०७६ किंवा ९०७५०१११४२.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com