पदपथावरील मुलांनी लुटला अभ्यंगस्नानाचा आनंद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

पुणे - एक अनोखी पहाट... रांगोळ्यांचा थाट, मांडलेला पाट आणि दिव्यांचा झगमगाट, तेल-उटण्याचा सुवास, औक्षणाचं ताट, गोडाचा घास, नव्या कपड्यांचा साज या साऱ्याचा अविस्मरणीय अनुभव घेत पदपथावरील मुलांनी सोमवारी वसुबारसेच्या मुहूर्तावर अभ्यंगस्नानाचा शाही आनंद लुटला. 

निमित्त होते पदपथावरील राहणाऱ्या मुलांसाठी माजी उपमहापौर आबा बागूल आणि पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागूल यांनी आयोजित केलेल्या अभ्यंगस्नानाचे. 

खेळण्याचे आणि शिकण्याचे वय असतानाही केवळ परिस्थितीमुळे पोटाची खळगी भरण्याच्या विवंचनेतच रोजची सकाळ उजाडते. आई-वडिलांसह पदपथावर राहणाऱ्या या मुलांची सोमवारची सकाळ मात्र आनंददायी ठरली. आबा बागूल, जयश्री बागूल, अमित बागूल, हर्षदा बागूल यांनी मुलांना सुवासिक तेल-उटणे लावून, औक्षण करून त्यांना अभ्यंगस्नान घातले. 

अभ्यंगस्नानानंतर या मुलांना नवे कपडे, फराळ आणि फटाके अशी मेजवानी मिळाल्याने मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. या उपक्रमाला रोटरी क्‍लब शनिवारवाडाचे चंद्रशेखर पिंगळे, अभिषेक बागूल, गोरख मरळ, श्‍याम काळे, सोमनाथ कोंडे, महेश ढवळे आदींचे सहकार्य मिळाले.