घरकामगारांच्या विविध मागण्यांसाठी कामगार आयुक्तालयापुढे निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

पुणे - घरकामगार महिलांना घरेलू कल्याणकारी मंडळात नोंदणीसाठी वयोमर्यादा 70 वर्षे करावी. किमान वेतन आणि महागाई भत्ता द्यावा, कामांचे तास, पगारी रजा, विमा आणि भविष्य निर्वाह निधी आणि निवृत्तिवेतनासाठी सर्वंकष कायदा करावा, अशा विविध मागण्यांसाठी "घरेलू कामगार कृती समिती'च्या वतीने निदर्शने गुरुवारी शिवाजीनगर येथील सहकामगार आयुक्तालयापुढे निदर्शने आंदोलन करण्यात आले. 

पुणे जिल्हा घरकामगार संघटना सिटू, पुणे शहर मोलकरीण संघटना, सर्व श्रमिक संघ, महाराष्ट्र घरकामगार उगम संघटना, महाराष्ट्र घरेलू कामगार संघटना, मोलकरीण पंचायत, हिंद मजदूर सभा यांच्या संयुक्त "घरेलू कामगार कृती समिती'च्या वतीने आज निदर्शने करण्यात आले. या वेळी कॉम्रेड अजित अभ्यंकर, किरण मोघे, मेधा थत्ते, माया शिंदे, सिस्टर ज्यूली, सिस्टर रोज, शारदा वाडेकर, सरस्वती भांदिर्गे, पुष्पा चौहान, मंगला मिश्रा, चंद्रभागा सपकाळ, वसंत पवार आदी उपस्थित होते. या वेळी मान्यवरांनी मार्गदर्शनपर भाषणे केली. 

"महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळा'वर कामगार संघटनांचे प्रतिनिधी नेमावेत, राज्य सरकारकडून शंभर कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करावी. मातृत्व लाभाची रक्कम 6 हजार करावी. निवृत्तिवेतन 3 हजार रुपये करावी. मोलकरीण यांच्या पाल्यांना शिक्षणात सवलत द्यावी. केंद्र सरकारने मंजूर केलेला असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा कायद्याचा लाभ घरकामगारांना द्यावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन अप्पर कामगार आयुक्त अ. रा. लाकसवार यांना शिष्टमंडळाकडून सादर करण्यात आले.