महामानवाला अभिवादन 

महामानवाला अभिवादन 

पुणे - राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध संस्था-संघटनांकडून डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने संस्था-संघटनांकडून विविध सांस्कृतिक-सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते. व्याख्याने, चर्चासत्र, पुरस्कार वितरण यासह रक्तदान शिबिरे, गरजूंना चष्मेवाटप आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विविध कार्यक्रमांमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची माहिती देण्यात आली. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापौर मुक्ता टिळक व उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पुणे रेल्वेस्थानक परिसरातील पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नगरसेविका लता राजगुरू, नगरसेवक प्रदीप गायकवाड आणि क्षेत्रीय अधिकारी अरुण खिलारी उपस्थित होते. पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस समितीतर्फे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि बाळासाहेब शिवरकर यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कॉंग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, नगरसेवक अजित दरेकर, नीता रजपूत, मुकारी अलगुडे उपस्थित होते. पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे  हिराबाग येथील पक्ष कार्यालयात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस माजी महापौर दत्ता एकबोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. राजू गिरे, विनायक चाचर, नामदेव पवार आदी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष अस्लम खान यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. 

पुणे जिल्हा कॉंग्रेस मागासवर्गीय विभागातर्फे डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. विक्रम सावंत, रोहित लोंढे, राहुल तायडे, शिलार रतनगिरी, सुनीता जावरे उपस्थित होते. महापालिका शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी यांनीही अभिवादन केले. शोभा पण्णीकर, संगीता पवार, आशा बुजवे, अनिता मुनोत, नंदा धावडे उपस्थित होते. 

पुणे जिल्हा महिला कॉंग्रेस समितीतर्फे डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. महिला कॉंग्रेसच्या सरचिटणीस भारती कोंडे, छाया ओव्हाळ, विशाल हरपळे, सीमा सावंत उपस्थित होते. राष्ट्रीय समाज पक्षातर्फे डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. प्रदेश सचिव डॉ. उज्ज्वला हाके, सनी रायकर, महिला अध्यक्षा सुरेखा कदम, बापू कांबळे, नशीर शेख या वेळी उपस्थित होते. प्रियदर्शनी शिक्षण संस्थेतर्फे अध्यक्षा शशिकला कुंभार यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. सिंधू बसवंत, महेश कुंभार, वर्षाराणी कुंभार, चंद्रकला दहिभाते उपस्थित होते. 

सामाजिक समरसता मंचातर्फे राम बांगड आणि नंदकुमार राऊत यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. मकरंद ढवळे, ज्ञानेश्‍वर गुरव, कांता दरेकर आणि घनश्‍याम वाघमारे उपस्थित होते. खडकमाळ आळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज आणि महात्मा फुले विचार मंचातर्फे सुरेश बोराटे यांनी पुष्पहार अर्पण केला. राजेंद्र कदम, अनिल मासुळे, राजा मासुळे आणि मिलिंद बोराटे उपस्थित होते. या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. तसेच, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप आणि गरजूंना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. 

लोकजनशक्ती पक्षातर्फे महाराष्ट्र प्रदेश सचिव अशोक कांबळे यांनी पुणे रेल्वेस्थानक येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. संजय आल्हाट, प्रसाद शेलार, विजय गायकवाड आणि कन्हैया पाटोळे उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलातर्फे के. बी. मोटघरे, बी. बी. जगताप, अण्णा शिंदे यांनी अभिवादन केले. सम्राट अशोक सेनेतर्फे अध्यक्ष विनोद चव्हाण, कुमार चक्रे, नागेश मिसाळ आणि योगेश शेलार यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.  भाजपच्या प्रभाग क्र. 14 मधील संदीप चव्हाण यांनी डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com