कुलकर्णी यांना अंतरिम अटकपूर्व जामीन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

पुणे - गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने अटक पूर्व जामीन नाकारल्यानंतर बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला असून, पुढील सुनावणी शुक्रवारी होईल.

बांधकाम व्यावसायिक कुलकर्णी दांपत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज केला होता. पोलिसांनी त्याला विरोध केला होता. विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी सरकार पक्षाने केलेला युक्तिवाद मान्य करीत अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. त्याचप्रमाणे अंतरिम जामिनास मुदतवाढ देण्याची मागणीही अमान्य केल्याने ‘डीएसके’ यांना केव्हाही अटक होण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. उच्च न्यायालयात त्यांनी दाद मागितली असून, अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी ॲड. श्रीकांत शिवदे, ॲड. गिरीश कुलकर्णी यांनी शुक्रवारी बाजू मांडली. उच्च न्यायालयाने या अर्जावर सरकार पक्षाला बाजू मांडण्याचे आदेश दिले आहे. तोपर्यंत कुलकर्णी दांपत्याला अंतरिम अटकपूर्व जामीन दिल्यामुळे त्यांची अटक एक आठवडा लांबली आहे.