इजिप्तचा कांदा बाजारात दाखल

इजिप्तचा कांदा बाजारात दाखल

पुणे - मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारात इजिप्तचा कांदा दाखल झाला आहे. कांद्याचे वाढलेले भाव नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने ही आवक किती उपयुक्त ठरते हे त्याच्या मागणीवरच अवलंबून आहे.

देशात बहुतेक बाजारपेठेत कांद्याचे भाव वधारले आहेत. या पार्श्‍वभूमीवर इजिप्त येथील कांदा आयात केला जात आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारातील कांदा-बटाटा विभागात मुंबई येथून या कांद्याची 24 टन इतकी आवक झाली. किरकोळ विक्रेत्यांकडून या कांद्याला फारशी मागणी नाही, परंतु हॉटेल व्यावसायिक आणि खानावळ चालकांकडून त्याची खरेदी सुरू आहे. पुण्यातून काही कांदा हा दक्षिण भारतात पाठविला आहे. आकाराने मोठा आणि भारतीय कांद्याच्या तुलनेत चव चांगली नसल्याने त्याला कमी म्हणजे दहा किलोला 340 रुपये इतका भाव मिळत आहे. देशातील कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी इजिप्तचा कांदा आयात केला जात आहे, असे व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले. ""याचा आकार मोठा असल्याने एका किलोमध्ये साधारणतः 4 ते 5 कांदे येतात. या कांद्याला पुण्यात विशेष मागणी नसते, त्यामुळे दक्षिण भारतातील राज्यात तो विक्रीसाठी पाठविला गेला. पुढील पंधरा दिवसांत स्थानिक कांद्याची आवक वाढल्यास भाव कमी होण्यास मदत होईल,'' असेही त्यांनी नमूद केले.

बुधवारी बाजारात स्थानिक भागातून जुन्या आणि नवीन कांद्याची एकूण 50 ट्रक आवक झाली. जुन्या कांद्याची खेड, जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर येथून सुमारे 20 ट्रक तर नवीन कांद्याची नगर, श्रीगोंदा, लोणंद भागातून सुमारे 25 ते 30 ट्रक इतकी आवक झाली. जुन्या कांद्याला दहा किलोला 320 ते 420 रुपये आणि नवीन कांद्याला दहा किलोला 250 ते 400 रुपये इतका भाव मिळाला. नाशिक भागातूनही 5 ते 7 ट्रक जुन्या कांद्याची आवक झाली असून त्याला दहा किलोला 350 ते 380 रुपये इतका भाव मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com