निवृत्तीच्या तरतुदीसाठी इक्विटी हा उत्तम पर्याय - सौरभ कटारिया

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

पुणे - ‘‘ठेवींचे व्याजदर घसरत आहेत; तर सोन्याची चमकही कमी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘इक्विटी’ हा ॲसेट क्‍लास चांगला परतावा मिळवून देऊ शकेल. निवृत्तीच्या काळाची तरतूद म्हणूनदेखील हाच गुंतवणूक पर्याय उत्तम ठरेल,’’ असे मत बीओआय ॲक्‍सा इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स प्रा. लि.चे निधी व्यवस्थापक (इक्विटी) सौरभ कटारिया यांनी व्यक्त केले.

कंपनीने बीओआय ॲक्‍सा मिडकॅप टॅक्‍स फंड-सीरिज-१ या नावाने नवी १०वर्षीय बंद मुदतीची इक्विटी लिंक्‍ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस) सुरू केली आहे. त्या निमित्ताने कटारिया पुण्यात आले होते. ‘सकाळ’शी बोलताना ते म्हणाले, की निश्‍चित उत्पन्नाच्या पर्यायातून मिळणारे व्याज कमी-कमी होत चालले आहे. गुंतवणुकीच्या विविध ॲसेट क्‍लासचा विचार केला, तर इक्विटी हाच पर्याय सध्या आकर्षक ठरताना दिसतो. दीर्घकाळाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून यात गुंतवणूक केल्यास चलनवाढीच्या दरावर मात करणारा परतावा मिळू शकतो. निवृत्तीच्या काळाची तरतूद म्हणूनही ही गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. यात साधारणपणे १५ टक्‍क्‍यांच्या आसपासचा परतावा मिळू शकतो.

थेट शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची जोखीम घ्यायची नसेल, तर म्युच्युअल फंडासारखा उत्तम पर्याय बाजारात उपलब्ध आहे. यात ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’च्या (एसआयपी) मार्गाने गुंतवणूक करणे हिताचे ठरते, असे त्यांनी नमूद केले.

शेअर बाजारातील अस्थिरतेविषयी अकारण भीती बाळगली जाते, असे नमूद करून ते म्हणाले, की शेअर बाजारात अस्थिरता, चढ-उतार हे राहणारच. त्यामुळे बाजारातील अस्थिरता ही जोखीम असत नाही. चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करणे, ही जोखमेची असू शकते. आपल्या उद्दिष्टानुसार, गुंतवणुकीसाठी योग्य योजनेची निवड हे जास्त महत्त्वाचे ठरते.

Web Title: pune news Equity is the best option for retirement benefits