चार तासांत ईव्हीएम हॅकिंग अशक्‍य- वंदना चव्हाण

स्वप्निल जोगी
शनिवार, 27 मे 2017

पुणेः "ईव्हीएम मशिन हॅक करण्यासाठीच काय, पण त्या मशिनची साधी मूलभूत तांत्रिक माहितीही करून घ्यायची झाली; तरी एखाद्या कुशल तंत्रज्ञालाही चार तास पुरायचे नाहीत. मात्र, तरीही निवडणूक आयोगाने केवळ चार तासांचा मर्यादित वेळ देऊन हे मशिन हॅक करण्याचे आव्हान राजकीय पक्षांपुढे ठेवले आहे. हे निव्वळ अशक्‍य आहे. परंतु, तरीही आम्ही पक्ष म्हणून हे आव्हान पेलण्याचे ठरविले आहे,'' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी निवडणूक आयोगाच्या मनमानीवर बोट ठेवले.

ईव्हीएम मशिन हॅक करून दाखविण्याचे निवडणूक आयोगाचे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने शुक्रवारी स्वीकारले होते. त्या पार्श्‍वभूमीवर चव्हाण शनिवारी बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, "ईव्हीएम मशिनमध्ये फेरफार करता येऊ शकतात, असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याची तपासणी आवश्‍यक ठरते. पण, हे मशिन पूर्णतः समजून घ्यायला काहींना दोन तासही लागू शकतील, काहींना दोन दिवस; तर काहींना महिनाभरही लागू शकेल. त्यामुळे आयोगाने सरसकट चार तासांची अट घालणे योग्य नाही. मात्र, असे असले तरी निवडणुकांतील पारदर्शितेसाठी या मशिनची विश्‍वासार्हता पडताळून घेणे आम्हांला गरजेचे वाटते. म्हणून आम्ही हे आव्हान स्वीकारले आहे.''

ताज्या बातम्याः