पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017
पुणे - अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुकला, हॉटेल मॅनेजमेंट पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना 24 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येतील. त्यानंतर 31 ऑगस्टपर्यंत संस्थास्तरावर प्रवेश घेता येईल. त्याची ही प्रक्रिया.

प्रवेशाची प्रक्रिया

पुणे - अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुकला, हॉटेल मॅनेजमेंट पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना 24 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येतील. त्यानंतर 31 ऑगस्टपर्यंत संस्थास्तरावर प्रवेश घेता येईल. त्याची ही प्रक्रिया.

प्रवेशाची प्रक्रिया
- संस्थास्तरावर प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याने तंत्र शिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरावा.
- प्रवेशासाठी आवश्‍यक कागदपत्रांच्या मूळ प्रति सुविधा केंद्रावर घेऊन जाव्यात. तेथे कागदपत्रांची पडताळणी करून अर्ज निश्‍चित करावा.
- सुविधा केंद्रावर अर्ज निश्‍चिती केल्यानंतर केंद्राचा शिक्का आणि केंद्र समन्वयकाची सही असलेले निश्‍चितिपत्र घ्यावे.
- विद्यार्थ्याने नंतर त्याला सोयीच्या आणि रिक्त जागा असलेल्या महाविद्यालयात हव्या असलेल्या अभ्यासक्रमासाठी अर्ज करावा. त्याला अर्ज निश्‍चितिपत्राची प्रत जोडावी.
- महाविद्यालयाकडे आलेल्या अर्जानुसार संबंधित महाविद्यालय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करील. त्या प्रमाणे प्रवेश होतील.
- अभ्यासक्रमांच्या रिक्त जागा संबंधित महाविद्यालयांच्या संकेतस्थळावर पाहायला मिळतील. या जागांवर 31 ऑगस्टनंतर कोणतेही महाविद्यालय प्रवेश देऊ शकणार नाही.

प्रवेशासाठी मुदतवाढ मिळाली आहे. त्यात बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले किंवा पुनर्मूल्यांकनात गुण वाढून पात्र ठरलेले विद्यार्थी भाग घेऊ शकतील. या प्रक्रिया संबंधी अधिक माहिती व मार्गदर्शक हवे असल्यास तंत्र शिक्षण संचालनालयाच्या बहिरटनगर परिसरातील विभागीय कार्यालयाशी संपर्क करावा.
- राजेंद्र गायकवाड (सहायक संचालक)

पुणे

पुणे  - शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालये, तसेच जिल्ह्यात मंडलस्तरावर आधार नोंदणी केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम...

02.33 AM

पिंपरी - गुरुवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील वातावरण उत्सवमय झाले आहे. घराघरात घट बसविण्याची तसेच...

02.30 AM

पुणे -  ""वयाच्या 25 वर्षांपर्यंत मी कधीही रुग्णालयाची पायरी चढले नाही; पण अचानकच मला आजार झाला. डॉक्‍टरांच्या तपासणीत...

02.30 AM