नेत्ररोगावरील कार्याबद्दल डॉ. केळकरांना ‘सुवर्ण’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

पुणे - नेत्ररोग विषयातील अतुलनीय योगदानाबद्दल पुण्यातील राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्थेतील (एनआयओ) नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर यांचा ‘इंट्रॉक्‍युलर इम्लॅंट अँड रिफ्रॅक्‍टिव्ह सोसायटी ऑफ इंडिया’तर्फे सुवर्ण पदक देऊन गौरव करण्यात आला. सोसायटीच्या नवी दिल्ली येथे झालेल्या वार्षिक परिषदेत याचे वितरण करण्यात आले. 

‘इंट्राऑक्‍युलर इम्प्लांट अँड रिफ्रेक्‍टिव्ह सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. गौरव लुथ्रा, डॉ. अमर अगरवाल, वैज्ञानिक समितीचे डॉ. महिपाल सचदेव, जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने उपस्थित होते. डॉ. केळकर यांचे नेत्ररोग विषयातील विविध संशोधन पेपर आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. संशोधन, उपचार आणि नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नेत्ररोग विषयात योगदान दिल्याबद्दल हा गौरव केला आहे. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर डोळ्यांत होणारा जंतुसंसर्ग दुर्मिळ असतो. त्यातून दृष्टी जाऊ शकतो. या आजाराबद्दल डॉ. केळकर यांनी संशोधन केले आहे. अशा प्रकारच्या ५० टक्‍क्‍यांपर्यंत लोकांना दृष्टी मिळू शकते, असे परदेशातील संशोधन आहे. आपल्याकडे ६७ टक्‍क्‍यांपर्यंत दृष्टी वाचविता येते, असे येथील संशोधनातून त्यांनी सिद्ध केले आहे.

टॅग्स