शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

पुणे - विविध मागण्यांसाठी सुरू असलेले राज्यव्यापी शेतकरी आंदोलन आजही अनेक ठिकाणी सुरूच होते. मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, नाशिक, जळगाव, सोलापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी आंदोलन झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील अणदूर येथे महामार्गावर आणि शिवसैनिकांनी रत्नागिरी येथे गोवा-मुंबई महार्गावर आंदोलन केल्याने वाहतूक काही काळ ठप्प पडली होती. कोल्हापूर येथे आज भाजीपाल्याची आवक वाढली आणि दूध संकलनही सुरळीत राहिले.

हिंगोली : जिल्ह्यात तीन ठिकाणी रास्ता रोको
बीड : पिंपळनेरचा आठवडी बाजार बंद
उस्मानाबाद : सोलापूर-हैदराबाद मार्गावर अणदूर येथे रास्ता रोको
रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावर शिवसेनेचे रास्ता रोको
सांगली : जिल्ह्यात जेलभरो आंदोलन शांततेत
धुळे : तापीनदीपात्रात शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन
नाशिक : कारसुळच्या उपसरपंचाचे तहसील कार्यालयासमोर उपोषण
अकोला : शिवसैनिकांनी फाडले कर्जमुक्तीचे पोस्टर