शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत बारामतीत बंद

pune news farmer strike continues bandh in Baramati
pune news farmer strike continues bandh in Baramati

बारामती - शेतकरी मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी आज (सोमवार) बारामतीतील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने कडकडीत बंद ठेवली. सर्व संघटना व संस्थांनीही या बंदमध्ये सहभागी होत आपला पाठिंबा जाहिर केला. 

कालच बारामतीतील व्यापाऱ्यांनी शेतक-यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी बारामती बंदमध्ये सहभागी व्हायचा निर्णय घेतला होता. आज त्यानुसार सकाळपासूनच सगळी दुकाने बंद होती. अत्यावश्यक सेवांना मात्र या बंदमधून वगळण्यात आले होते. त्या मुळे या सेवा सुरळित सुरु होत्या. 

लोकांनाही बारामती बंदची पूर्वकल्पना असल्याने कोणाचीच कसलीच गैरसोय झाली नाही. बारामती बंदच्या पार्श्वभूमीवर आणि सोमवारी इतर वेळेस दिसणारी गर्दी आज अभावानेच दिसली. बंद असल्याने बाहेरगावाहून लोक आज बारामतीकडे फिरकलेच नाहीत, त्या मुळे बँकासह इतर कार्यालयातही आज गर्दी तुरळक होती. 

भाजी मंडईतील व्यापा-यांनीही आजच्या बंदला पाठिंबा दिल्याने आज शहरात भाजी व फळे यांची खरेदी विक्री झाली नाही. दरम्यान आज काही युवकांनी मोटारसायकलवरुन गावातून फेरी काढली. शहराच्या उपनगरात काही ठिकाणी व्यवहार सुरु असल्याचे दिसल्यावर त्यांना या युवकांनी व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेही या बंदमध्ये सहभागी होत आपला पाठिंबा जाहिर केला. तालुकाध्यक्ष संभाजी होळकर व शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर यांनीही पाठिंबा जाहिर केला. 

आज सकाळपासूनच उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर, पोलिस निरिक्षक विजय जाधव व सुरेश गौड यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता, त्या मुळे कोठेही काहीही अनुचित प्रकार घडला नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com