बैलांनी मारल्याने शेतक-याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

गावापासून दोन किलोमीटर अंतरावर त्यांची शेती आणि गोठा होता.बैलांनी धडक मारल्यावर उपचारासाठी घेऊन जाण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.  काळ्या मातीच्या सेवेत त्यांनी आयुष्य खर्च केले.त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

टाकवे बुद्रुक - बैलांनी मारल्याने भोयरेतील शेतक-याचा उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. भरत लक्ष्मण भोईरकर(वय-६१) असे या शेतक-याचे नाव आहे. गावातील कष्टाळू शेतकरी अशी त्यांची ख्याती आहे.

शनिवारी ता.४ला दिवस भर शेताची कामे पूर्ण करून, त्यांनी  सायंकाळी सहाच्या सुमारास  बैलांना पाणी पाजून गोठयात बांधताना बैलांनी भरत यांच्या छातीवर जोरात धडक मारली. नित्यनेमाने बैलगाडी जोडून शेतावर दिवस भर राबण्याचा त्यांचा दिनक्रम होता.गावरान बैलांची उत्तम प्रकारे जोपासना करण्याचा मोठा छंद त्यांना होता. 

गावापासून दोन किलोमीटर अंतरावर त्यांची शेती आणि गोठा होता.बैलांनी धडक मारल्यावर उपचारासाठी घेऊन जाण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.  काळ्या मातीच्या सेवेत त्यांनी आयुष्य खर्च केले.त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

Web Title: pune news: farmers death

टॅग्स