पीएमपी डेपो व्यवस्थापका विरूध्द खटला दाखल

संदीप जगदाळे
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

हडपसर (पुणे): गाडीतळ पीएमपीएल डेपोत महापिलेकेच्या आरोग्य विभागाच्या किटक प्रतिबंधक विभगामार्फेत दोनदा सर्वेक्षण केले. दोन्ही वेळेस डेंगीच्या आळ्या तसेच एडीस इजिप्ती डास डेपोच्या आवारातील भंगार साहित्य, बॅरल, टायर, पाण्याची डबकी यामध्ये आढळून आल्या.

याबाबत व्यवस्थापकाला दोनदा हेल्थ नोटीसा दिल्या. मात्र, डेपो व्यवस्थापकाने याकडे दुर्लक्ष केले व डासोत्पत्ती स्थाने नष्ट केली नाहीत. त्यामुळे आरोग्यस विघातक परिस्थीती निर्माण केल्याप्रकरणी तसेच एडीस इजीप्ती डासांच्या आळ्या आढळून आल्यानंतरही कोणकीच उपाययोजना डेपो व्यवस्थापकाने केली नाही. त्यामुळे डेगी, चुकुनगुनिया, हिवताप यासारखा आजार वाढून सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच शहरात व हडपसरमध्ये डेंगीच्या रूग्णांची संख्या वाढली असताना निष्काळजीपणा केला आहे.       

त्यामुळे अखेर डेपो व्यवस्थापक कैलास गावडे यांच्या विरोधात पुणे महानगरपालिका कोर्ट, स्पेश ज्यूडूशियल मॅजीस्ट्रेट वर्ग १ यांच्याकडे आरोग्य विभागाने खटला दाखल केला आहे. याप्रकरणी हडपसर सहाय्यक आयुक्त कार्यालयातील मलेरिया सर्वे इनस्पेक्टर उत्तम बांदल यांनी सहाय्यक आरोग्य अधिकारी डॅा. कल्पना बळीवंत व आरोग्य अधिकारी आणि आयुक्तांच्या परवानगी हा खटला दाखल केला आहे.

अखेर आरोग्यस विघातक परिस्थीती निर्माण केल्याप्रकरणी व्यवस्थापका विरूध्द खटला दाखल करण्यात आल्यामुळेच खटला दाखल केल्याची माहिती सहाय्यक आरोग्य प्रमुख डॅा. कल्पना बळिवंत यांनी दिली.