अतिक्रमणांवर जबर दंडाचा ‘इलाज’

अतिक्रमणांवर जबर दंडाचा ‘इलाज’

पुणे - रस्त्यावर विनापरवाना हातगाडी लावली किंवा स्टॉल उभा केला, तर संबंधितांना आता किमान पाच हजार रुपये दंड होणार आहे. तर दुकानांपुढे पदपथांवर अतिक्रमण झाल्यास किमान १० ते २० हजार रुपये दंड आकारण्याचा प्रस्ताव महापालिकेने केला आहे. त्याला शहर फेरीवाला सुधारणा समितीने मंजुरी दिली आहे. ११ प्रकारची अतिक्रमणे हटविण्यासाठीच्या शुल्कात जबर वाढ झाली आहे. याबाबतचा प्रस्ताव १८ ऑक्‍टोबर रोजी सर्वसाधारण सभेत मंजूर झाल्यावर त्याची अंमलबजावणी 
होणार आहे. 

अतिक्रमण निर्मूलन करणे हे महापालिकेसाठी सध्या डोकेदुखी झाली आहे. शहराच्या मध्य भागात म्हणजे महात्मा फुले मंडई, तुळशीबाग, बाबूगेनू चौक, शनिपार, रामेश्‍वर चौक, अप्पा बळवंत चौक, शनिवारवाडा, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, पत्र्या मारुती चौक, टिळक रस्ता आदी भागांत पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालताही येत नाही, इतकी अतिक्रमणांची संख्या वाढली आहे. तसेच बंद पडलेली जड व हलकी वाहनेही रस्त्यावर उभी केली जातात. त्यामुळेही वाहतुकीची कोंडी होते. तसेच मुख्य रस्त्यांवरील दुकानांपुढे कच्चे अथवा पक्के बांधकाम करूनही अतिक्रमणे करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. 

या पार्श्‍वभूमीवर अतिक्रमण करणाऱ्यांना जरब बसविण्यासाठी पालिकेने अतिक्रमण निर्मूलन शुल्कात वाढ केली आहे. त्याला शहर फेरीवाला समितीनेही मंजुरी दिली आहे. महापालिकेच्या १८ ऑक्‍टोबरच्या सर्वसाधारण सभेत हा ठराव मंजूर झाल्यावर त्याची अंमलबजावणी होणार आहे. महापौर मुक्ता टिळक, आयुक्त कुणाल कुमार यांनी यापूर्वी याबाबत सूतोवाच केले होते. त्यानुसार शुल्क वाढविले आहे.

अतिक्रमणांवर कारवाई केल्यावर संबंधित व्यावसायिक पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता कारवाई करताना सुधारित शुल्क वसूल करून संबंधिताचा माल परत करणार आहे. शुल्क न भरल्यास पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार आहे.
- माधव जगताप, अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख

अतिक्रमण निर्मूलनाचे सुधारित शुल्क 
अतिक्रमण प्रकरणाचा तपशील       जुने शुल्क       नवे शुल्क 

१. रस्त्यावर नादुरुस्त होऊन अथवा      
     कायमस्वरूपी बंद पडलेली वाहने    १५००      ३५०००
२. रस्त्यावर बंद पडलेल्या दुचाकी     १०००      ५०००
३. अनधिकृत स्टॉल      १०००      १००००
४. अनधिकृत हातगाडी      ५००      ५००० व ३०००
५. अनधिकृत बैठे पथारी व्यावसायिक      ५००       ५००० व ३०००
६. दुकानदारांनी दुकानापुढे केलेले अतिक्रमण       १०००      ५०००
७. पदपथावर कच्चे अथवा पक्के अतिक्रमण करणे      १००० व २०००      १०००० व २००००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com