पुणे: पोलिसावर गोळीबार करून मोटार पळवली

जनार्दन दांडगे
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

दरम्यान ही बाब यवत पोलिसांना समजताच, पोलिसांनी पुणे-सोलापुर महामार्गावरील सर्व टोलनाक्यावर पोलिस तपासनी सुरु केली. तसेच टोल नाक्य.ावरील सिसिटीव्हीची पहाणी केली. यवतचे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी तपासाची सुत्रे आपल्या हाती घेतली असुन, या प्रकरणाचा विविध मार्गानी तपास सुरु केला आहे.

लोणी काळभोर : नानवीज (ता. दौड) येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील पोलिस निरीक्षक महेश शिवलिंगप्पा तेलगंजी (रा. मोरेवस्ती, मांजरी बुद्रुक ता. हवेली) यांच्यावर यवत (ता. दौड) येथे चार अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून, त्यांच्या ताब्यातील स्वीफ्ट डिझायर कार पळवून नेल्याची घटना आज  (सोमवारी) सकाळी साडेसहाच्या घडली.

एर्टिगा या चार चाकीवाहनातून आलेल्या चार अज्ञात हल्लेखारोंनी पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत वीज उपकेंद्रासमोर सोलापूरकडे जाणाऱ्या मार्गीकेवर तेलगंजी यांच्यावर हल्ला केला आहे. तेलगंजी यांच्या पायाला गोळी लागली असुन, त्यांना पुढील उपचारासाठी यवत ग्रामीण रूग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी तेलगंजी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार यवत पोलिसांनी चार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश तेलगंजी आज (सोमवारी) सकाळी सहा वाजनेच्या सुमारास आपल्या स्वीफ्ट डिझायर कार ( एम एच 12 एन यु 9244) मधुन दौड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात निघाले होते. साडेसहा वाजनेच्या सुमारास तेलगंजी याची गाडी यवत वीज उपकेंद्रा समोर आली असता, पाठीमागुन आलेल्या एर्टीगामधील एकाने तेलगंगी यांना तुमच्या गाडीच्या मागच्या चाकाचे डिस्क निघाल्याचे सांगितले. यावर डिस्क निघाल्याची पाहण्यासाठी तेलगंगी स्विफ्टमधुन उतरुन चाकाची पहानी करत असतानाच, एर्टीगामधील उतरलेल्या दोघांनी तेलगंजी यांना पाठीमागुन पकडुन हातातील लोखंडी रॉडने मारहान करण्यास सुरुवात केली. तर मारहान करणाऱ्यापैकी एकाने स्वीफ्ट डिझायर ची चावी काढुन घेतली. तसेच स्वीफ्ट डिझायरमध्ये बसुन गाडी चालु करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेलगंजी यांनी मारहान करणाऱ्यानां प्रतिकार करण्याबरोबरच ओरडण्यास सुरुवात केली. त्याचवेळी हल्लेखोरापैकी एकाने तेलगंजी यांच्यावर रिव्हाल्वरमधुन गोळी झाडली. ही गोळी तेलगंजी यांच्यावर पायाला लागताच, तेलगंजी खालूी कोसळले. याचा फायदा घेत हल्लेखोर दोन्ही गाड्या घेऊन पसार झाले. 

दरम्यान ही बाब यवत पोलिसांना समजताच, पोलिसांनी पुणे-सोलापुर महामार्गावरील सर्व टोलनाक्यावर पोलिस तपासनी सुरु केली. तसेच टोल नाक्य.ावरील सिसिटीव्हीची पहाणी केली. यवतचे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी तपासाची सुत्रे आपल्या हाती घेतली असुन, या प्रकरणाचा विविध मार्गानी तपास सुरु केला आहे.