पुणे: 760 मीटर उंचीवर फडकावला राष्ट्रध्वज

राजेंद्रकृष्ण कापसे
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

सिंहगडावरील हे ठिकाण 760 मीटर उंची आहे. तर समुद्र सपाटीपासून 1312 फूट उंची सिंहगडाची आहे. गडावरील माथ्यावर श्रीकोंढणेश्वर मंदिराजवळ हा ध्वजस्तंभ आहे. 
येथे फडकविण्यात आलेल्या झेंड्याचा आकार 21 बाय 14 फूट आहे.

पुणे : समुद्र सपाटीपासून 760 मीटर उंचीवरील मोठा ध्वजाचे सिंहगडावर स्वातंत्र्य दिनानिमित्त हवेलीचे नायब तहसीलदार सुनील शेलार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण झाले.

सिंहगडावरील हे ठिकाण 760 मीटर उंची आहे. तर समुद्र सपाटीपासून 1312 फूट उंची सिंहगडाची आहे. गडावरील माथ्यावर श्रीकोंढणेश्वर मंदिराजवळ हा ध्वजस्तंभ आहे. 
येथे फडकविण्यात आलेल्या झेंड्याचा आकार 21 बाय 14 फूट आहे.

यावेळी खडकवासला येथील मंडल अधिकारी अरूण पिसे, घेरा सिंहगडचे तलाठी मिलींद सेठी, पंचायत समितीचे माजी सदस्य दत्ता जोरकर, ग्रामपंचायत सदस्य अमोल पढेर, वनरक्षक स्मिता अर्जुन, सुरक्षारक्षक नितीन गोळे, बबन मरगळे, रोहित बोरकर, तुकाराम पढेर, सौरभ पांडे, दत्ता चव्हाण, प्रफुल्ल भिलारे, विजय मुजुमले यावेळी उपस्थित होते. 
२६ जानेवारी, 1 मे व 15 ऑगस्ट रोजी येथे शासकीय ध्वजारोहण होते. जिल्ह्यातील एवढ्या उंचीवरील हा सर्वात मोठा ध्वज आहे असा दावा पंचायत समितीचे माजी सदस्य दत्ता जोरकर यांनी केला आहे.