वारज्यात तीस रुपयांत जेवण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

पुणे - मोरे वेल्फेअर ट्रस्टतर्फे शिवणे वारजे भागात ‘गुडविल इंडिया एक सामाजिक’ उपक्रमाअंतर्गत गरजूंना ३० रुपयांत जेवण देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 

या कॅंटीनमधील प्लेटमध्ये दोन भाकरी, पिठलं-भात, रस्याची भाजी व ठेचा इत्यादींचा समावेश आहे. ज्येष्ठ व निराधार व्यक्तींना या अंतर्गत मोफत जेवण देण्यात येणार आहे. उपक्रमाचे उद्‌घाटन माजी खासदार अशोक मोहोळ यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार मेधा कुलकर्णी, विश्राम कुलकर्णी, रामभाऊ बराटे, नगरसेविका सायली वांजळे, प्रदीप धुमाळे, युनिव्हर्सल ग्रुपचे रणजित मोरे, ट्रस्टचे अध्यक्ष कालिदास मोरे, शशिकांत देवकर उपस्थित होते.

मोरे म्हणाले, ‘‘वारजे परिसरात कष्टकरी राहत असून त्यांना वेळप्रसंगी उपाशी झोपावे लागते. यामुळे हा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तसेच आर्थिक परिस्थिती हलाकीची असणाऱ्या कपडे व अन्न देण्याचेही प्रयत्न करण्यात येत आहे.’’