रस्ता गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी आंदोलन 

रविंद्र जगधने
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

याबाबतचे "सकाळ'मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती. त्यानंतर विविध सामाजिक संस्थांनी मुख्यमंत्री व महापालिका आयुक्तांकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. मात्र, महापालिकेने या कामातील 49 लाखांचा निधी प्रभाग क्रमांक 47 मधील इतर रस्त्यांच्या कामाला वापरला असल्याचे सांगून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

पिंपरी : काळेवाडीतील अठरा मीटर रुंद डीपी रस्त्याचे काम कागदोपत्री 
झाल्याचा प्रकार "सकाळ'ने उघडकीस आणला. मात्र, हा निधी दुसरीकडे वापरला असल्याचा दावा महापालिकेने केला. या प्रकरणातील जनतेची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत यासाठी शनिवारी (ता. 4) अपना वतन संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन केल्यानंतर महापालिका प्रशासनाने कारवाईचे लेखी आश्‍वासन दिले. 

याबाबतचे "सकाळ'मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती. त्यानंतर विविध सामाजिक संस्थांनी मुख्यमंत्री व महापालिका आयुक्तांकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. मात्र, महापालिकेने या कामातील 49 लाखांचा निधी प्रभाग क्रमांक 47 मधील इतर रस्त्यांच्या कामाला वापरला असल्याचे सांगून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी अपना वतन संघटनेच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. शेवटी महापालिका सहशहर अभियंता जीवन गायकवाड यांनी अपना वतनचे संस्थापक-अध्यक्ष सिद्घीक शेख यांना या प्रकरणात महापालिका योग्य ती कारवाई करणार आहे. असे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

त्यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, शिवसेना प्रणित व्यापारी सेनेचे युवराज दाखले, परिवर्तन संघटनेचे इम्रान शेख, अपना वतनचे दिलीप गायकवाड, प्रकाश पठारे, हरिशचंद्र तोडकर, जितेंद्र जुनेजा, सुदेश सूर्यवंशी, अब्दुल शेख, सॅन्ड्रा डिसोझा, राजश्री शिरवळकर, शेतकरी कामगार पक्षाचे नाना फुगे, राष्ट्रीय समाज पक्षाचे भारत मनोहर, उमेश लोहार, एमआयएम पक्षाचे धम्मराज साळवे, शफी काझी, इकरा इकरा एज्युकेशन ट्रस्टचे सलीम शेख, जमत इस्लामी हिंदचे इर्शाद शेख, भारतीय सर्वोदय पार्टीचे नसीम उस्मानी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाचे सतीश कदम, लहुजी सेनेचे सुनील म्हस्के, सचिन कांबळे, प्रसाद केसरी, भ्रष्टचार निर्मूलन समितीचे डी .व्ही. गवई, विनोदसिंह राजे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे नकुल भोईर, युवरत्न सेवा समितीचे सचिन वाघमारे, संजय गायके, सम्राट सेनेचे मिलिंद भोसले, शिवाजी धोत्रे, फय्याज नदाफ, राजश्री मारणे, कल्पना भेगडे, जमीर शेख, अनिल कारेकर आदी उपस्थित होते. आंदोलनाची सांगता भारत माझा देश आहे या प्रतिज्ञेने करण्यात आली

Web Title: Pune news fraud on road work in Pimpri