बाप्पासाठी बनवा उकडीचे मोदक, सुरळीची वडी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

कार्यशाळेत पाकतज्ज्ञ अनुराधा केळकर मार्गदर्शन करतील. उकड कशी तयार करावी, मोदक कसे बनवावेत, सारण बनविण्यासाठी पदार्थांचे योग्य प्रमाण, सोप्या पद्धतीने मोदक व सुरळीची वडी कशी बनवावी या गोष्टी शिकवल्या जातील

पुणे - सकाळ मधुरांगण व बिग बझारतर्फे गणेशोत्सवानिमित्त उकडीचे मोदक आणि सुरळीची वडी तयार करण्याची कार्यशाळा रविवारी (ता. 20) पुणे येथे आणि सोमवारी (ता. 21) चिंचवडमध्ये घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जे मधुरांगणचे सभासद होतील, त्यांना मेघा गृहिणी उद्योग यांच्यातर्फे 100 रुपयांहून अधिक किमतीची सव्वा किलो क्षमतेची मेगा मल्टिपर्पज आकर्षक बॅग गिफ्ट म्हणून मिळणार आहे. या मेगा बॅगमध्ये पालेभाज्या 10-12 दिवस ताज्या राहतात.

कार्यशाळेत पाकतज्ज्ञ अनुराधा केळकर मार्गदर्शन करतील. उकड कशी तयार करावी, मोदक कसे बनवावेत, सारण बनविण्यासाठी पदार्थांचे योग्य प्रमाण, सोप्या पद्धतीने मोदक व सुरळीची वडी कशी बनवावी या गोष्टी शिकवल्या जातील. रेसिपीच्या प्रिंट आउट्‌स विकत मिळतील. सभासदांना प्रवेश विनामूल्य असून फोनवर नावनोंदणी आवश्‍यक आहे. सदस्येतर महिलांसाठी 650 रुपये शुल्क आहे. मधुरांगण सभासदांनी बिग बझारमध्ये एक तास आधी नोंदणी करावी.

कार्यशाळेचे वेळापत्रक
रविवार (ता. 20) बिग बझार, कोथरूड सिटी प्राइडच्या शेजारी, दु. 2 वा.
सोमवार (ता. 21) बिग बझार, ऍडलॅब्स सिनेमा बिल्डिंगमध्ये, चिंचवड. दु. 2 वा.
बिग बझारतर्फे विजयी स्पर्धकांना प्रथम क्रमांकासाठी रु. 7000, द्वितीय रु. 5000, तृतीय रु. 3000, गिफ्ट व्हाउचर, तर उत्तेजनार्थसाठी आकर्षक बक्षीस देण्यात येईल.
स्पर्धकांनी कार्यक्रमाच्या अर्धा तास आधी येणे अपेक्षित आहे.
संपर्क ः 9075011142, 8378994076.

स्पर्धेचे नियम ः
* स्पर्धेला येताना एका कागदावर रेसिपीसाठीचा वेळ, साहित्य, खर्च, किती जणांसाठी बनविली असे लिहून आणावे. तसेच, कागदावर आपले नाव न लिहिता आपल्या फॉर्ममधील नोंदणी क्रमांक मोठ्या अक्षरांत लिहावा.
* रेसिपी टेबलवर मांडताना डिस्पोजेबल वस्तूमधून सादर करावी, कारण कोणतीही वस्तू परत मिळणार नाही, याची नोंद घ्यावी.
* मोदक हा नावीन्यपूर्ण किंवा पारंपरिक असावा, तिखट किंवा गोड असावा. रेसिपी फक्‍त 2 व्यक्तींपुरतीच असावी.
* या स्पर्धेत सजावटीला महत्त्व न देता रेसिपीची चव, वापरलेले पदार्थ, करण्याची पद्धत/कृती, तसेच वस्तूंचे प्रमाण, नावीन्यता या गोष्टींचा परीक्षणात विचार होईल.
* स्पर्धकांनी स्पर्धेच्या ठिकाणी 1.30 ते 2 या वेळेमध्ये आपल्या रेसिपी मांडून रेसिपी शोच्या ठिकाणी जाऊन बसावे. 2 नंतर आलेल्या स्पर्धकांचा विचार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

- हजारो रुपयांची "फ्री व्हाउचर्स'
- वार्षिक सभासदत्व शुल्क अवघे रुपये 999
- नोंदणीनंतर सभासदांना "तनिष्का'च्या 12 अंकांसह 1 हजार 499 रुपये किमतीच्या 23 पिसेसच्या मल्टिपर्पज सेटची भेट
(भेटवस्तूसाठी कृपया मोठी पिशवी आणावी.)
- नामवंत ब्रॅंड्‌सची हजारो रुपयांची फ्री गिफ्ट व्हाउचर व डिस्काउंट व्हाउचर भेट
- ऑनलाइनसाठी प्ले स्टोअरवर "madhurangan' टाइप करा, ऍप डाऊनलोड करूनही सदस्यत्व नोंदणी शक्‍य. पासवर्ड 6 ते 7 डिजिटचा असावा.
- कुरिअरचा ऑप्शन निवडून सभासदत्व आणि कुरिअरची रक्कम ऑनलाइन भरल्यास गिफ्ट व इतर सर्व साहित्य घरपोच
- ऍपवरून नोंदणी करणाऱ्या सभासदांना सर्व भेटवस्तू 15 दिवसांनंतर मिळतील; अन्यथा "सकाळ'च्या बुधवार पेठ किंवा पिंपरी कार्यालयात आधी संपर्क
साधून (सकाळी 11 ते सायं. 6) भेटवस्तू नेता येतील.
- ऍपव्यतिरिक्त नोंदणीसाठी - "सकाळ' मुख्य कार्यालय, 595, बुधवार पेठ, पुणे किंवा
"सकाळ' पिंपरी कार्यालय, सनशाईन प्लाझा, हॉटेल रत्नाच्या मागे, पिंपरी (सकाळी 11 ते सायं. 6)
- अधिक माहितीसाठी संपर्क ः 8378994076 किंवा 9075011142