सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

शहरातील गणेश मंडळे यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करणार आहेत. पुण्याच्या गणेशोत्सवाने दशकानुसार अनेक बदल अनुभवले; तसेच सामाजिक उपक्रमही राबविले. भविष्यातही शहराच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी संघटनशक्तीचा सकारात्मक उपयोग करण्याचा निर्धार गणेश मंडळांनी व्यक्त केला. ‘सकाळ’ कार्यालयात झालेल्या बैठकीत मंडळांच्या प्रतिनिधींनी विविध कल्पनादेखील मांडल्या. 

शहरातील गणेश मंडळे यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करणार आहेत. पुण्याच्या गणेशोत्सवाने दशकानुसार अनेक बदल अनुभवले; तसेच सामाजिक उपक्रमही राबविले. भविष्यातही शहराच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी संघटनशक्तीचा सकारात्मक उपयोग करण्याचा निर्धार गणेश मंडळांनी व्यक्त केला. ‘सकाळ’ कार्यालयात झालेल्या बैठकीत मंडळांच्या प्रतिनिधींनी विविध कल्पनादेखील मांडल्या. 

मंडळाच्या माध्यमातून आम्ही अंध-अपंग, गरीब नागरिकांना आर्थिक मदत, आपत्ती काळात आर्थिक, शारीरिक मदत याव्यतिरिक्त सणांच्या साजरीकरणातून सामाजिक ऐक्‍य वाढविण्यासाठी नेहेमीच प्रयत्नशील असतो. तसेच सामाजिक कार्यात मोलाचा हातभार लावणाऱ्या व्यक्तींचा सत्कार मंडळातर्फे केला जातो. अधिक गाजावाजा न करता अतिशय साधेपणाने परंतु तितकाच देखणा उत्सव साजरा करत एक आदर्श गणेशोत्सव आम्ही साजरा करत असतो.
- रवींद्र रणधीर, अध्यक्ष, श्री जिलब्या मारुती मंडळ ट्रस्ट

समाजात सध्या विविध कारणांमुळे अशांतता वाढत आहे. यामुळे शांतता प्रस्थापित करण्यासाठी मंडळ कार्यरत असणार आहे. याची सुरवात मंडळाच्या यंदाच्या देखाव्याद्वारे केली जाणार आहे. यामध्ये थायलंड येथील बुद्ध मंदिराची प्रतिकृती साकारली जाईल. या व्यतिरिक्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ऋषितुल्य व्यक्तींचा सत्कार, आरोग्य शिबिरांचे आयोजनदेखील केले जाईल. महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार मंडळातर्फे करण्यात येणार आहे.
- श्‍यामसिंग पाटोळे, अध्यक्ष, नवग्रह मित्रमंडळ

आगामी काळात मंडळातर्फे वृक्ष संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे महत्वपूर्ण कार्य हाती घेण्यात येणार आहे. नवीन झाडे लावण्यासोबतच आहेत ती झाडे वाचविण्याचे आवाहन नागरिकांना केले जाणार आहे. या व्यतिरिक्त मंडळातर्फे पुढील वर्षभर कोंढवा येथील मातृधाम वृद्धाश्रमाला आर्थिक मदत दिली जाणार आहे. इतकेच नाही, तर आवश्‍यकतेच्या वेळी कार्यकर्ते स्वत: त्या ठिकाणी जाऊन हवी ती मदत, श्रमदान करतील. तसेच रक्तदान, गरजू मुलांसाठी आर्थिक मदतही केली जाणार आहे.
- प्रवीण परदेशी, अध्यक्ष, गुरुजी तालीम मंडळ.

पुणे

मंचर : वाळद (ता. खेड) येथे सायली निलेश शिंदे (वय ७) या मुलीला घरात खेळत असताना सोमवारी (ता.१८) संध्याकाळी पाच वाजता सर्पदंश झाला...

08.54 AM

खडकवासला : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी दिवसभर धो धो पाऊस पडल्याने खडकवासला, पानशेत व वरसगाव हो तिन्ही धरणे 100 टक्के भरली...

08.48 AM

पुणे - बाजीराव रस्त्यावर पोलिस वाहतूक शाखेने "नो पार्किंग'चे फलक लावले आहेत. मात्र, जेथे फलक लावले तेथेच बेशिस्त चालक वाहने...

06.03 AM