एटीएम कार्डचे क्‍लोनिंग करून लुटणारी टोळी जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

पुणे - डेबिट आणि क्रेडिट कार्डची हुबेहूब नक्‍कल (क्‍लोनिंग) करून त्याद्वारे एटीएममधून पैसे काढून फसवणूक करणाऱ्या दोन नायजेरियन्सना सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून 20 डेबिट कार्ड, सात ब्लॉक क्‍लोनिंग केलेली कार्ड आणि आठ मोबाईल असा सुमारे पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

पुणे - डेबिट आणि क्रेडिट कार्डची हुबेहूब नक्‍कल (क्‍लोनिंग) करून त्याद्वारे एटीएममधून पैसे काढून फसवणूक करणाऱ्या दोन नायजेरियन्सना सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून 20 डेबिट कार्ड, सात ब्लॉक क्‍लोनिंग केलेली कार्ड आणि आठ मोबाईल असा सुमारे पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ऑकवेहॅश फॉरच्युश (रा. न्यू लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव) आणि बशिर डाकिन गारी उस्मान (रा. पिरंगुट, दोघे मूळ रा. नायजेरिया) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी परिसरातील एका व्यक्‍तीचे एटीएम कार्ड त्याच्याजवळ होते; परंतु त्याच्या खात्यामधून 67 हजार रुपये शहरातील वेगवगेळ्या एटीएम मशिनमधून काढण्यात आले. तसेच त्या कार्डचा हॉटेल आणि पेट्रोल पंपांवरही वापर करण्यात आला. या प्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास सायबर गुन्हे शाखेकडून सुरू होता.

सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काही एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात नायजेरियन व्यक्‍तीने पैसे काढल्याचे समोर आले. त्यावरून पोलिसांनी काही एटीएम आणि पेट्रोल पंपांवर सापळा रचला. पिंपळे गुरव येथील एका एटीएममधून पैसे काढत असताना फॉरच्युश याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्याचा साथीदार उस्मान यालाही अटक केली.

स्किमर बसवून कार्डचे क्‍लोनिंग
आरोपींनी शहरातील काही मॉल्स, हॉटेल आणि पेट्रोल पंपांवरील एटीएम मशिनमध्ये स्किमर बसविले होते. एखादी व्यक्‍ती पैसे काढताना त्याच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डची संपूर्ण माहिती त्यामध्ये कॉपी होते. त्यानंतर त्या स्किमरद्वारे कार्डचे क्‍लोनिंग करून बनावट कार्ड तयार केले जाते. त्याचा वापर करून आरोपींनी एटीएममधून पैसे काढले.

पुणे

पुणे - ""नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस तत्पर आहेतच. पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत सजग असले पाहिजे; परंतु...

02.00 AM

पुणे - महापालिकेच्या दरपत्रकात (डीएसआर) समाविष्ट नसलेल्या वस्तू आणि सेवांचे दर ठरविण्याचे खातेप्रमुख आणि नगर अभियंत्यांचे अधिकार...

01.48 AM

पिंपरी - पवना धरणापासून महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या प्रकल्पाचा अंदाजित खर्च नियोजित रकमेच्या...

01.30 AM