पालकमंत्र्यांच्या मुलाचा साधेपणाने विवाह 

पालकमंत्र्यांच्या मुलाचा साधेपणाने विवाह 

पुणे - पालकमंत्री गिरीश बापट यांचा मुलगा गौरव व भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा नीता केळकर यांची मुलगी स्वरदा यांचा विवाह आज साधेपणाने झाला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्य मंत्रिमंडळातील बहुतेक सदस्य, खासदार, आमदार, नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी, समाजातील विविध स्तरांतील नागरिक उपस्थित होते. 

शुभारंभ लॉन्स येथे उभारलेल्या मंडपामध्ये आकर्षक सजावट व विद्युतरोषणाई करण्यात आली होती. सकाळी साडेनऊ वाजल्यापासून बापट परिवार आणि त्यांच्या चाहत्यांची लग्नस्थळी गर्दी झाली होती. पुण्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी गौरव यांच्या विवाहासाठी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी लग्नाला हजेरी लावल्याने या परिसरातील वाहतूक इतरत्र वळविली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com