पुण्यात शनिवारपासून "ग्रीन होम एक्‍स्पो'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

सेकंड होमसाठी नामी संधी; "सीझन 15'चे आयोजन

सेकंड होमसाठी नामी संधी; "सीझन 15'चे आयोजन
पुणे - वाढते शहरीकरण आणि धकाधकीच्या जीवनाला आपण त्रासलेलो असतो. अशा वेळी निसर्गाच्या सानिध्यात शांत क्षण घालविण्यासाठी आपले एक घर असावे, हे सर्वसामान्यांचे स्वप्न साकारण्यासाठी "ग्रीन होम एक्‍स्पो सीझन 15' ही नामी संधी ठरणार आहे. शनिवारपासून (ता. 12) हे दोनदिवसीय प्रदर्शन सुरू होत आहे.

वाई, पाचगणी, महाबळेश्‍वर, कोकण, दापोली, सासवड, उरुळी कांचन, भोर, मुळशी, लवासा, शिवापूर, बारामती, शिरवळ, हिंजवडी, कामशेत, जेजुरी, वाघोली इत्यादी निसर्गरम्य ठिकाणी बंगलो प्लॉटस, सेकंड होम, विकेंड होम, फार्महाउस प्लॉटस उपलब्ध आहेत. एकाच छताखाली ग्राहकांना ही संधी उपलब्ध होण्यासाठी "सकाळ-ऍग्रोवन'च्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

यापूर्वीच्या प्रदर्शनात अनेक ग्राहकांनी या संधीचा फायदा घेत निसर्गरम्य ठिकाणी आपले स्वप्नातील फार्महाउस साकारले आहे. प्रदर्शनात नामवंत व्यावसायिकांनी सहभाग नोंदविला असून, पुणेकरांसाठी यानिमित्ताने फार्महाउस, विकेंड होम, फार्महाउस प्लॉट खरेदीची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

'ग्रीन होम एक्‍स्पो सीझन '
- तारीख - 12 ते 13 ऑगस्ट
- प्रदर्शन स्थळ - गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे
- वेळ - सकाळी 11 ते रात्री 8
- प्रवेश - निःशुल्क