जिमच्या "टिप्स'ही आता ऑनलाइन 

जिमच्या "टिप्स'ही आता ऑनलाइन 

पुणे - जिममध्ये जाऊन वर्कआउट करायला वेळ नसतो, अशांनी आता घरबसल्या ऑनलाइन वर्कआउट आणि डाएटचे मार्गदर्शन करणाऱ्या ट्रेनरचा सल्ला घेत आहेत. विविध संकेतस्थळ, ऍप आणि यूट्यूबवरील व्हिडिओच्या माध्यमातून घरबसल्या वर्कआउटचे पद्धतशीर मार्गदर्शन, न्युट्रीशियनकडून डाएटचा सल्ला, योगा, झुंबा, ऍरोबिक्‍सचे रीतसर प्रशिक्षण मिळत असल्याने तरुण-तरुणींकडून ऑनलाइन वर्कआउटला पसंती मिळत आहे. 

फिटनेस ट्रेनर्संनी स्वतःचे ऍप्स आणि संकेतस्थळ विकसित केले असून, त्याद्वारे ट्रेनर तरुण-तरुणींना वर्कआउट कसे आणि कधी करावे, याविषयी मार्गदर्शन करत आहेत. यूट्यूबवरील व्हिडिओ, फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज आणि व्हॉट्‌सऍप ग्रुपच्या माध्यमातूनही यूट्यूब आणि डाएटचा सल्ला देत आहेत. विशेषतः योगा प्रशिक्षणासाठी ऑनलाइन व्हिडिओ आणि योगातज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे. काहींनी तर ऑनलाइन यूट्यूब क्‍लासेस सुरू केले आहेत. 

जिममध्ये जाऊन यूट्यूब करायला वेळ मिळत नाही, असे तरुण-तरुणी ऑनलाइन संकेतस्थळ, ऍपच्या माध्यमांचा वापर करून फिटनेस ट्रेनरचा सल्ला घेत आहेत; तसेच झुंबा, ऍरोबिक्‍स आणि योगाचे व्हिडिओ पाहून व्यायाम करत आहेत. मी स्वतः अशाप्रकारे तरुणांना मार्गदर्शन करतो. घरबसल्या यूट्यूब आणि डाएटविषयी पद्धतशीर माहिती मिळत असल्याने तरुणांचा याकडे कल वाढला आहे. काहींनी तर ऑनलाइन कोर्सेस आणि क्‍लासेसही घेतात. यामुळे पैशाची आणि जा-ये करण्यातील वेळेचीही बचत होत आहे. 
- गजेंद्र जाधव, फिटनेस ट्रेनर 

खास डाएट पॅकेज 
आयटी क्षेत्रातील नोकरदार संकेतस्थळ आणि ऍपच्या माध्यमातून न्युट्रीशियनकडून डाएटचा सल्ला घेत आहेत. जेवणात कोणत्या पदार्थांचा समावेश असावा, दिवसभरात काय खावे, काय नाही, याबाबतचे मार्गदर्शन न्युट्रीशियन करत आहेत. त्यासाठी न्युट्रीशियन्स खास डाएट पॅकेजही देत आहेत. 

व्हॉट्‌सऍप ग्रुपद्वारे सल्ला 
जिममधल्या फिटनेस ट्रेनर्सनी आपल्या सदस्यांसाठी खास "फिटनेस ग्रुप' तयार केले आहेत. या माध्यमातूनही ते यूट्यूब आणि डाएटचा सल्ला देत आहेत. फिटनेससंदर्भातील सदस्यांच्या विविध प्रश्‍नांना उत्तरे देत असून, व्हिडिओद्वारे झुंबा, ऍरोबिक्‍स आणि योगाचे प्रशिक्षण दिले जात आहे. महिला-युवतींकडून त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. 

फिटनेस ब्लॉग 
फिटनेस ट्रेनरकडून संकेतस्थळ, फेसबुक पेजद्वारे दररोज फिटनेस ब्लॉग लिहिले जात आहेत. दररोजचा आहार कसा असावा, योगाचे महत्त्व काय, झुंबा प्रशिक्षण का आवश्‍यक आहे, आदी विषयांवर ब्लॉग लिहिणाऱ्या ट्रेनर्संना फॉलो करणाऱ्या लोकांची संख्याही मोठी आहे. हा रोजचा ब्लॉग लोकांसाठी उपयुक्त ठरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com